Sindhudurg: जिल्ह्यातील तापमानात घट होण्याची शक्यता

0
43
जिल्ह्यातील तापमानात घट होण्याची शक्यता

सिंधुदुर्ग- सध्याच्या थंडीने झोप उडविलेली असतानाचा या थंडीत आणखी भर पडणार आहे. तीन दिवसांनंतर किमान तापमानात २ ते ३ -अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने बुधवारी वर्तविला. http://sindhudurgsamachar.in/maharasjtra-यंत्रणांचा-गैरवापर-करू/

किमान तापमानात घट होण्याची शक्यता असल्याने कमी तापमानाचा पिकाच्या वाढीवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी भाजीपाला पिके, रोपवाटिका तसेच बागायती पिकांना सायंकाळच्या वेळेस पाणी द्यावे,जेणेकरून जमीन उबदार राहण्यास मदत होईल. रात्रीच्या वेळेस उष्णतेसाठी कोंबड्यांच्या शेडमध्ये गरजेनुसार विजेचे बल्ब लावावेत. तसेच थंडीपासून संरक्षणासाठी भिंतीच्या जाळ्यांना गोणपाटाचे पडदे लावावेत. शेळ्या, करडाचे थंडीपासून संरक्षणासाठी उष्णतेसाठी विजेचे बल्ब लावावेत.

शेततळ्यातील/ तलावातील मत्स्यशेतीमध्ये सकाळी आणि रात्री उशिरा देण्यात येणारे खाद्याचे प्रमाण नेहमीपेक्षा कमी द्यावे. ‘खाद्य चेक ट्रेचा वापर करण्याचा सल्ला दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here