sindhudurg: तिलारी डाव्या उजव्या कालव्याची कामे शिवसेनेने पाडली बंद…_

0
131
तिलारी डाव्या उजव्या कालव्याची कामे शिवसेनेने पाडली बं

‌दोडामार्ग : आघाडी सरकारने तिलारी धरणाचे पाणी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या वझरे माटणे उसप पंचक्रोशीतील गावांना तसेच तिलारी धरणग्रस्तांना मिळाले पाहिजे यासाठी पन्नास कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला पण संबंधित जलसंपदा विभाग अधिकारी कार्यकारी अभियंता रोहीत कोरे यांनी या निधीचा गैरवापर करून डाव्या उजव्या कालव्यात बाॅक्स बांधकाम हाती घेतले. विनाठायी या निधीचा विनियोग केला जात आहे, त्यामुळे संतापलेल्या दोडामार्ग येथील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांनी तिलारी डाव्या उजव्या कालव्याची दोडामार्ग केळीचेटेंब सासोली भटवाडी येथील कामे शुक्रवारी बंद करून संपूर्ण कामांची चौकशी करून याला जबाबदार कार्यकारी अभियंता रोहीत कोरे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्याशिवाय गप्प बसणार नाही वेळेप्रसंगी रस्त्यावर उतरणार असा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी व इतरांनी दिला. https://sindhudurgsamachar.in/sangali-शालेय-पोषण-आहारातून-32-विद/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here