Sindhudurg: नवाबाग येथे माघी गणेश जयंती उत्साहात

0
46

वेंगुर्ला प्रतिनिधी- नवाबाग येथे माघी गणेश जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आली. सिंधुरत्न ढोलपथकाच्या गजरात गणरायाचे आगमन झाले.  तदनंतर गणरायाची विधीवत पूजा करुन तीर्थप्रसादाचे देण्यात आला.http://sindhudurgsamachar.in/sindhudurgबॅ-खर्डेकर-महाविद्यालय/

नवाबागचा राजाची इको फ्रेंडली सजावट  पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. तसेच गणेश जयंती निमित्त खास आकर्षण असलेल्या लकी ड्राॅ कुपन स्पर्धेचा मानकरी जॉनी डिसोजा हा ठरला. उत्सवाच्या पहिल्या दिवशी दाभोली येथील दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळाचा भेद कुष्मांडाचा महिमा टेंबलाईचा‘ हा ट्रीकसिनयुक्त नाट्यप्रयोग संपन्न झाला. दुस-या दिवशी नवाबाग येथील महिलांनी सादर केलेले वारकरी भजन या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. दुपारी महाप्रसाद व सायंकाळी डीजेच्या  तालावर मिरवूणक काढून बाप्पाला भक्तीभावाने निरोप देण्यात आला. या उत्सवास विविध राजकीय मंडळी व सामाजिक कार्यकर्त्यांनी भेटी देवून नवाबाग गणेश मंडळाबद्दल गौरवोद्वार काढले.

फोटोओळी – गणपतीकडे केलेली इको फ्रेंडली आरास लक्षवेधी ठरली.

      

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here