वेंगुर्ला प्रतिनिधी – पालकांनी आपल्या पाल्यांचा व शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना घडविताना त्यांच्या अंगातील कलागुणांनुसार पुढील विकासाचे संकेत लक्षात घेऊन त्या कलागुणांना विकसीत करण्यासाठी विषयांचे वाचन पुस्तकांच्या माध्यमातून व्हावे. त्या विषयाचे प्रगल्भ ज्ञान विद्यार्थ्यांना व्हावे. यासाठी पयत्न करावेत, त्यासाठी वाचनालयातील पुस्तकांचा शालेय वेळेखेरीज अवांतर वेळेत करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करावे असे आवाहन अॅड.देवदत्त परुळेकर यांनी पुरस्कार व बक्षिस वितरण प्रसंगी केले. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-विविध-क्षेत्रातील-उल्ल/
वेंगुर्ला नगरवाचनालयातर्फे जाहिर झालेल्या पुरस्कारांचे वितरण व शाळांसाठी घेतलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम २२ जानेवारी रोजी नगरवाचनालयाच्या लक्ष्मीबाई कोरगांवकर सभागृहात संपन्न झाला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दै.तरुण भारतचे डेक्स इन्चार्ज अवधूत पोईपकर (सावंतवाडी) यांना आदर्श पत्रकार पुरस्कार, गजानन वालावलकर (मालवण) यांना ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार, वीरधवल परब (वेंगुर्ला) यांना साहित्यिक पुरस्कार तर राजन पांचाळ (कुडाळ) यांना ग्रंथालय कर्मचारी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच संस्थेतर्फे सिंधुदुर्ग जिल्हास्तरावर आयोजित केलेल्या ज.बा. आरोस्कर, म. शा. भांडारकर स्मृती वकृत्व स्पर्धा, प्राथमिक शाळांसाठी घेण्यात आलेल्या श्रीकृष्ण स.सौदागर स्मृती सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा, अ.ना.शेणई पुरस्कृत वकृत्व स्पर्धा, बालवाडी स्पर्धा, भालचंद्र कर्पे स्मृती गायन स्पर्धा, पं. जनार्दनशास्त्री कशाळीकर स्मृती पाठांतर स्पर्धा आणि सुदत्त कल्याण निधी पुरस्कृत वकृत्व स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. देवदत्त परूळेकर, कार्याध्यक्ष अनिल सौदागर, कार्यवाह कैवल्य पवार, कार्यकारीणी सदस्य नंदन वेंगुर्लेकर, महेश बोवलेकर, सदानंद बांदेकर, बंटी बिजीतकर, श्रीनिवास सौदागर, प्रमिला पाईपकर,पांचाळ, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप सावंत, ग्रंथपाल गुरूदास मळीक, कर्मचारी किशोर सावंत, पुजा धावडे, माजी नगरसेवक प्रशांत आपटे, साप्ताहिक किरातचे सहसंपादक सुनिल मराठे यांसह पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
निराधार गोरगरीबांना न्याय देण्यासाठी वृत्तपत्राची लेखणी ही महत्वाची ठरलेली असल्याचे उदारहण पोईपकर यांनी दिले. तसेच गजानन वालावलकर यांनी, राज्यातील १२ हजार वाचनालयापैकी नगरवाचनालय वेंगुर्ला ही संस्था एक नंबरवर आहे. नवीन पिढीला वाचन संस्कृतीतून घडविण्याचे काम नगर वाचनालय वेंगुर्ला संस्था करीत आहे. तर राजन पांचाळ यांनी, वाचनामुळे आपण घडलो. वाचनातून समाज घडतो. त्यासाठी वाचन हे अत्यावश्यक आहे असे स्पष्ट केले.
फोटोओळी – वेंगुर्ला नगरवाचनालयातर्फे जाहीर झालेले पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.