Sindhudurg: पाल गावातील विकासकामे व समस्यांबाबत पालकमंत्र्यांना निवेदन

0
45
पाल गावातील विकासकामे व समस्यांबाबत पालकमंत्र्यांना निवेदन

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला तालुक्यातील पाल गावात काही समस्या जाणवत आहेत. यामध्ये विद्युत लाईन जमिनीतून घालून मिळणे, खडीकरण व डांबरीकरण होणारा रस्ता मुख्यमंत्री किवा प्रधानमंत्री सडक योजनेमध्ये सामाविष्ट करणे, जुन्या बंधा-याचे नुतनीकरण करणे, बीबीएनएस किवा बीएसएनएल टॉवर उभारणे याकडे पाल ग्रामपंचायतीने पालकमंत्री रविद्र चव्हाण यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले असून समस्या निवारण करण्यासाठी मागणीही केली आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सुतार-शिल्पकार-समाज-मंड/

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत संपूर्ण पाल ग्रामपंचायत  बिनविरोध निवडून आली. नुतन सरपंचउपसरपंच आणि सदस्यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी गावातील विकास कामांकडे आणि समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य दिले असून तशा आशयांचे निवेदनही पालकमंत्री चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केले आहे.

 तुळस-पलतवाडी ते पाल खालचीवाडी-घाडीवाडी-तळेबांधवाडी-मिरखालेवाडी-धाऊसवाडी-कांथरवाडी मार्गे मातोंड रस्ता मुख्यमंत्री सडक योजना किवा प्रधानमंत्री सडक योजनेमधून मंजूर करावा. जेणेकरुन तळेबांधवाडी-मिरखोलवाडी, तुळस-पलतड व मातोंड-आसोली येथील ग्रामस्थांची गैरसोय दूर होईल. तसेच विद्यार्थी, वाहनचालक व भाविकना जवळचा रस्ता मिळेल. झेंडोबा मंदिर ते पाल मानसीपर्यंत खारभूमी बंधा-यावर असणा-या मो-या ठिकठिकाणी नादुरुस्त झाल्या आहेत. बंधा-याची उंची कमी असल्याने व बंधा-यास केलेले पिचिगचे दगड वाहून गेल्याने उधाणाच्यावेळी समुद्राचे खारे पाणी बंधा-यावरुन पाल-गोडावणेवाडी मधील शेती व बागायतीमध्ये घुसून शेतक-यांचे नुकसान होत आहे. खा-या पाण्यामुळे विहिरीतील पाणीही मचुळ होत असल्याने जुन्या बंधा-याचे नुतनीकरण करावे.

पाल सड्यावर महावितरणची ३३ हजार केबीची लाईन गेली आहे. या लाईनमुळे २०११पासून ते आजपर्यंत सड्यावरील शेतक-यांचे विद्युत घर्षणामुळे होणा-या आगीने मोठ्या प्रमाणात आंबा व काजू पिकांचे नुकसान होत आहे. याबाबत संबंधित कार्यालयाला निवेदनही देऊन त्यावर ठोस उपाय काढलेला नाही. त्यामुळे विद्युत लाईन जमिनीतून घालून मिळण्यासाठी आपण जिल्हा नियोजनमधून भरघोस निधी मंजूर करुन द्यावा.

सुमारे १३७३च्या आसपास लोकसंख्या असलेल्य पाल गावात केळव आयडीया कंपनीचे मोबाईल नेटवर्क मिळत असून ते मोचेमाड येथे असणा-या टॉवरवरुन उपलब्ध होत आहे. सध्या तेही नेटवर्क व्यवस्थित नसल्याने विद्यार्थी व ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. डिजिटल व्यवहाराच्या जमान्यात व्यवहारांचा खेळखंडोबा होत आहे. तरी या गंभीर परिस्थितीचा विचार करुन आपल्या मार्फत पाल गावात बीबीएनएल किवा बीएसएनएल मोबाईल नेटवर्क उपलब्ध करुन देण्यासाठी नविन टॉवर उपलब्ध करुन देऊन ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर करावी असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी सरपंच कावेरी गावडे, भाजपाचे माजी शक्तीकेंद्र प्रमुख कमलेश गावडे, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, महादेव गावडे यांच्यासह अन्य उपस्थित होते.

फोटोओळी – पाल गावातील विकासकामांबाबत सरपंच कावेरी गावडे यांनी पालकमंत्री यांना निवेदन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here