सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी पूर्णवेळ ग्रामसेवक देण्याचे केले कबूल .
मालवण -: तारकर्ली काळेथर गावचे ग्रामसेवक कामकाजात सहकार्य करत नाहीत. ग्रामपंचायतीत उपस्थित राहत नाहीत. त्यांच्या मनमानी कारभारामुळे खाते बदल रखडला आहे. विकास कामे ठप्प पडली असून पूर्ण वेळ ग्रामसेवकासाठी येथील सरपंच मृणाली मयेकर यांना प्रजासत्ताक दिनी उपोषणाचे हत्यार उपसावे लागले. https://sindhudurgsamachar.in/देश-विदेश-दिल्लीत-कर्तव्/
सरपंचांसह ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसल्यानंतर प्रशासनाला अखेर जाग आली असून लवकरच पूर्णवेळ ग्रामसेवक उपलब्ध करून देतो असे आश्वासन सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी सरपंच मयेकर यांना दिले आहे. या आश्वासनानंतर उपोषण तूर्तास स्थगित केले असल्याचे त्या म्हणाल्या.