Sindhudurg: प्रेरणा अंतर्गत १८ जानेवारीला एक दिवसीय मार्गदर्शनपर मोफत कार्यशाळा आयोजित

0
32
Sindhudurg: प्रेरणा अंतर्गत १८ जानेवारीला एक दिवसीय मार्गदर्शनपर मोफत कार्यशाळा आयोजित

ओरोस: यूपीएससी आणि एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रेरणा अंतर्गत १८ जानेवारीला सकाळी १० ते ४ यावेळेत एक दिवसीय मार्गदर्शनपर मोफत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. याची नोंदणी

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe1VWAAnpi4szBQ7QeEk3EndZOIvJjgZvJe1JAk2V-j6fWnfg/viewform?usp=sf_link या वर आजपासून ते १५ जानेवारी पर्यंत होणार असून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे. ‘प्रेरणा’ अंतर्गत जिल्हा प्रशासनाच्यावतीने यापूर्वी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मान्यवरांचे मार्गदर्शन सत्रे झाली आहेत. http://sindhudurgsamachar.in/21-गन-सॅल्यूट-इंटरनॅशनल-कॉन/

१८ जानेवारीला ओरोस येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात ही कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेत जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, प्रशिक्षणार्थी आय.ए.एस. करिष्मा नायर हे मार्गदर्शन करणार आहेत. यु.पी.एस.सी. संदर्भातील शंका, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत याबाबत यावेळी चर्चा करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रश्नोउत्तरे सत्राचे देखील आयोजन करण्यात आले आहे. यात यूपीएससी परीक्षेची तयारी कशी करावी, आत्मविश्वासाने मुलाखतीला कसे सामोरे जावे, येणाऱ्या अडचणींवर मार्ग कसा काढावा, यावर मुक्तपणे संवाद साधण्यात येणार आहे.

त्याशिवाय अभ्यासक्रम त्याअनुषंगाने विषयानुरुप असणाऱ्या पुस्तकांची यादी देण्यात येणार आहे. एम.पी.एस.सी. बाबत परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी प्रसेनजित चव्हाण, तहसिलदार श्रीधर पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी या मोफत कार्यशाळेसाठी इच्छुक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe1VWAAnpi4szBQ7QeEk3EndZOIvJjgZvJe1JAk2V-j6fWnfg/viewform?usp=sf_link लिंकवर आपली नोंदणी १५ जानेवारीपर्यंत करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here