वेंगुर्ला प्रतिनिधी-वायंगणी-हरीचरणगिरी येथील रहाते घर बेकायदेशीररित्या जेसीबीच्या सहाय्याने जमिनदोस्त केल्याप्रकरणी वेंगुर्ला पोलीसांत दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार आरोपी दिगंबर भिकाजी प्रभू-खानोलकर, शैलेश श्रीपाद प्रभू-खानोलकर, संकेत नारायण प्रभू-खानोलकर व सूर्यकांत दिगंबर गावडे यांना वेंगुर्ला पोलीसांनी अटक केली. त्यांना वेंगुर्ला न्यायालयासमोर हजार केले असता एक दिवसांच्या पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-उपजिल्हा-रुग्णालय-नवीन/
७ जानेवारीला दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास रमण खानोलकर यांचा पुतण्या शैलेश खानोलकर, रमण खानोलकर यांचा मुलगा हे जेसीबी घेऊन सदर जमिनीतील आमच्या वायंगणी येथील घराजवळ आले. यावेळी माझे आई-वडील यांनी आमचे घर पाडू नका, असे त्यांना सांगितले. यावेळी त्यांनी माझ्या आईला ढकलून दिले. परत आलीस तर मारणार, अशी धमकी दिली. सायंकाळी ७.३० वाजता मी घरी आलो असता, आमचे वायंगणी ग्रामपंचायत नं. ६५९ हे घर जमीनदोस्त झाल्याचे दिसून आले. तसेच घरातील सोन्याचे दागिने (चैन, अंगठी) व पितळीची जुनी भांडी तसेच कागदपत्रे चोरीला गेल्याचे तक्रारीत कोरगांवकर यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार वेंगुर्ला पोलिसांत गुन्ह दाखले झाले होते. मात्र वेंगुर्ला पोलीसांनी अनेक दिवस काहीच न केल्याने वायंगणी-हरिचरणगिरी येथील रविद्र कोरगांवकर यांचे घर बेकायदेशीर पाडणा-या संशयितांना शनिवार २१ जानेवारीपर्यंत अटक न केल्यास न्यायासाठी २६ जानेवारीपासून वेंगुर्ला पोलीस स्टेशन येथे बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा रुपेश कोरगांवकर यांनी वेंगुर्ला पोलीस निरीक्षक यांना निवेदनाद्वारे दिल्यामुळे पोलीसांनी या प्रकरणी तात्काळ दखल घेत कारवाई करीत कोरगांवकर कुटुंबि