मत्स्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सोबतच्या बैठकीत निर्णय;पालकमंत्री रवींद्र चव्हाण, निलेश राणे यांचा यशस्वी पाठपुरावा; उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर यांची माहिती
प्रतिनिधी- अभिमन्यू वेंगुर्लेकर
मालवण -: केंद्रातील मत्स्य संपदा योजना सक्षमपणे जिल्ह्यात न राबविणे, त्यात आधीच्या सत्ताधाऱ्यांचा राजकीय हस्तक्षेप, डिझेल परतावा न मिळणे, सागर मित्र यांची नेमणूक न करणे, वादळातील मिळालेल्या नुकसान भरपाईत पक्षपात करणे असे प्रकार पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. त्यानुसार पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी मंत्रालयामध्ये मत्स्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे बैठक आयोजित केली होती.
त्यावेळी डिझेल परतावा वेळेवर न मिळाल्यास सोसायटीचे व मच्छीमारांचे होणारे नुकसान या संदर्भात निलेश राणे यांनी लक्ष वेधले. त्यामुळे भरघोस परतावा व संपूर्ण परतावा द्यावा अशी मागणी केली. त्यानुसार मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तत्काळ डिझेल परतावा मंजूर केला असल्याची माहिती भाजप उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी दिली.