Sindhudurg: महापुरुषांच्या केलेल्या अवमान प्रकरणी नागपूर विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षाचे आंदोलन

0
43

महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांना हटविण्याची मागणी;आंदोलनामध्ये आमदार वैभव नाईक यांचा सहभाग

प्रतिनिधी – पांडुशेठ साठम

नागपूर : महाराष्ट्रातील महापुरुषांच्या अवमान प्रकरणी राज्यपालांच्या विरोधात नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये अतिशय तीव्र पडसाद उमटले. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांना या पदावरून हटविण्यासाठी विरोधी पक्षाने विधानसभेमध्ये अनेक वेळा मागणी केली. राज्यपालांच्या निषेधार्थ हिवाळी अधिवेशनामध्ये विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांनी आंदोलन केले. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-राज्यस्तरीय-सन-२०२२-चा-द/

यामध्ये विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक त्याचप्रमाणे नाना पटोले, रोहित पवार, रवींद्र वायकर आदी महाविकास आघाडी सरकारचे आमदार सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here