Sindhudurg: माशाच्या उलटीची तस्करी,तिघांना रंगेहाथ पकडले

0
73
रत्नागिरीत लाच घेताना मुख्य लिपिक रंगेहाथ पकडले
रत्नागिरीत लाच घेताना सहाय्यक निबंधक कार्यालयातील मुख्य लिपिक रंगेहाथ पकडले

खेड- लुप्तप्राय प्रजातीच्या माशाच्या उलटीची (अंबरग्रीस) तस्करी करणाऱ्या तिघांना खेड पाेलिसांनी रंगेहाथ पकडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई रविवारी सायंकाळी खेडमधील भरणे नाका येथे करण्यात आली. या कारवाईत पाेलिसांनी दाेन दुचाकीही ताब्यात घेतल्या आहेत. अटक केलेले हे तिघे परजिल्ह्यातील असून, या तिघांची नावे पोलिसांनी गाेपनीय ठेवली आहेत.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-हडपसर-येथे-श्री-गजानन-एज/

लुप्तप्राय प्रजातीच्या माशाची उलटी (अंबरग्रीस) ची विक्री करण्यासाठी काही जण येणार आहेत, अशी गाेपनीय माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. त्यानंतर खेड पोलिस उपनिरीक्षक सुजीत सोनवणे यांनी पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली, खवटीचे वनरक्षक रानबा बंबर्गेकर यांच्यासह खेड पोलिसांचे एक पथक तयार केले.

या पथकाने महामार्गावरील भरणे नाका येथील साई रिसॉर्टच्या जवळ रविवारी सायंकाळी सापळा रचला. काही वेळाने या ठिकाणी तीन व्यक्ती संशयितरीत्या दोन दुचाकीवरून जात असताना या पथकाने पाहिले. त्यांना थांबवून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडील एका पिशवीत लुप्तप्राय प्रजातीच्या माशाची उलटी (अंबरग्रीस) मिळाली.पाेलिसांनी अटक केलेल्या तिघांवर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम २(१६), ३९, ४०(२), ४४(१), ४८(अ) (१), ४९, ४९ (ब), ५१ व ५२ प्रमाणे खेड पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्यामधील अन्य सहभागी व्यक्तींचा शोध पाेलिसांकडून सुरू आ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here