Sindhudurg: रामेश्वर मंदिरात स्थापना केलेल्या गणपतींचे विसर्जन

1
81
गणपती विसर्जन करताना भाविक.

वेंगुर्ला प्रतिनिधी – येथील ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात गणेश जयंती निमित्त पूजन करण्यात आलेल्या गणपतींचे गुरुवारी सायंकाळी विसर्जन करण्यात आले.

२२ जानेवारीपासून या मंदिरात माघी गणेश जयंती कार्यक्रम सुरु आहे. बुधवारी गणेश जयंतीचे औचित्य साधून गणेशयाग संपन्न झाले. यानिमित्त प्राणप्रतिष्ठा केलेल्या गणपतींचे विसर्जन गुरुवारी सायंकाळी करण्यात आले. यावेळी भक्तांनी गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष केला. गणेश जयंती दिवशी बहुसंख्य उपस्थित राहून गणपतींचे दर्शन घेतले. रात्रौ गणपती भगवती आणि नागेश्वर दत्त पालखी तसेच तरंगदेवता यांची प्रदक्षिणाही पार पडली. या उत्सवाची सांगता शुक्रवारी महाप्रसादाने होणार आहे. http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-जिल्ह्यात-शिष्यवृत्ती/

फोटोओळी – गणपती विसर्जन करताना भाविक.

1 COMMENT

  1. […] मालवण : मालवण शहरातील धुरीवाडा बोर्डिंग ग्राउंड मार्गावर असलेल्या दोन दुकांनाना शुक्रवारी पहाटे आग लागल्याची घटना घडली. मॉर्निग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना ही आग दिसताच त्यांनी इतरांना कळवले. नागरिक, अग्निशमन बंम्ब घटनास्थळी पोहचले मात्र भडकलेल्या आगीत दोन्ही दुकाने जळून खाक झाली. http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-रामेश्वर-मंदिरात-स्था… […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here