Sindhudurg: रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला आरोग्य सेवा केंद्राचा शुभारंभ

0
38
रोटरीच्या आरोग्य सेवा केंद्राचा शुभारंभ

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला शहर व परिसरातील गरीब व गरजू रुग्णांना तात्पुरत्या वापरासाठी निःशुल्क आरोग्याच्या सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनच्यावतीने आरोग्य सेवा केंद्र सुरु केले आहे. याचा लोकार्पण सोहळा रोटरी जिल्हा प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे व फर्स्ट लेडी रोटेरियन संध्या देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला.http://sindhudurgsamachar.in/sindhudurgरेडी-समुद्रात-बुडणाऱ्य/

यावेळी सहाय्यक प्रांतपाल दिपक बेलवलकरनिता गोवेकररोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनचे प्रेसिडेंट सुनिल रेडकरसेक्रेटरी पंकज शिरसाटराजेश घाटवळसंजय पुनाळेकरयोगेश नाईक आदी उपस्थित होते. शहरातील साकववाडा येथील सिद्धिविनायक प्लाझामध्ये सुरु करण्यात आलेल्या या आरोग्य सेवा केंद्रामध्ये रुग्णांच्या सोयीसाठी व्हीलचेअर व ऑक्सिजन कॉन्सनट्रेटक उपलब्ध करण्यात आले आहे. गरजूंनी नाईक अॅग्रोचे संचालक योगेश नाईक यांच्याशी संफ साधावा असे आवाहन केले आहे.

फोटोओळी – रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ल मिडटाऊनच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या आरोग्य सेवा केंद्राचा शुभारंभ रोटरी जिल्हा प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे व फर्स्ट लेडी रोटेरियन संध्या देशपांडे यांच्या हस्ते झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here