आंबोली – मानद वन्यजीव रक्षक महादेव भिसे यांनी दूरध्वनी वरुन आंबोली वनपरिक्षेत्रांचे वनअधिकारी व वनकर्मचारी,वन विभाग यांना नानापाणी रस्त्यांच्या बाजुला आठ ते दहा दिवसाचे माकडाचे पिल्लू असल्याचे दूरध्वनी वरुन कळविले. वन विभागाने तातडीने माकडाच्या पिल्लूला वन कार्यालयात आणले. त्याच्यावर प्राथमिक उपचार केले आणि त्याला दूधही पाजले. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-पंढरपूरच्या-विठुरायाच/
दिनांक 24 रोजी रत्याच्या कडेला आठ ते दहा दिवसाचे माकडाचे पिल्लू असल्याचे मानद वन्यजीव रक्षक महादेव भिसे यांनी वन विभागास कळविले. सदरचे पिल्लू वन विभागाने ताब्यात घेवून वन विभागाच्या रेस्क्यू टीमने पिल्लाच्या आईचा शोध घेतला. पण ती दिसून आली नाही. परंतु काही वेळानंतर एक मादी माकड आवाज करत आंबोली वनपरिक्षेत्राच्या कार्यालयाच्या परिसरात आले. या मादी माकडाच्या ओरडण्यावरून आणि अस्वस्थ हालचालींवरून उपस्थित वनअधिकाऱ्यांना ती याच पिल्लाची आई असल्याची खात्री झाली. त्यानी पिल्लाला कार्यालयाच्या आवारात झाडाखाली ठेवले तेव्हा पिल्लूही आपल्या आईला पाहून ओरडायला लागले. पिल्लाचे ओरडणे एकूण लगेचच त्यांची आई येवून त्या पिल्लाला आपल्या कुशीत घेवून आपल्या अधिवासात निघून गेली. वनक्षेत्रापाल आंबोली व वनकर्मचारी यांनी सदरचे बचाव कार्य यशस्वीपणे पार पाडले असे आंबोलीचे वनक्षेत्रपाल वि.अ. घोडके यांनी सांगितले.