Sindhudurg: विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा वेताळ प्रतिष्ठानकडून सन्मान

0
78
विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा वेताळ प्रतिष्ठानकडून सन्मान

कृषी,दशावतार,शिक्षण, दिव्यांग विकास, पत्रकार, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान

वेंगुर्ला प्रतिनिधी

वेंगुर्ला – केंद्र सरकारच्या युवक व क्रिडा मंत्रालयाच्या  नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्गचा आदर्श युवा मंडळ पुरस्कार प्राप्त संस्था वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस कडून सातत्याने विविध समाजपयोगी उपक्रम सातत्याने राबविले जातात. ज्या व्यक्तींनी आपल्या स्वकर्तुत्वाने समाजासाठी उल्लेखनीय कार्य केलेले आहे, अशा व्यक्तीचा सन्मान दरवर्षी मानपत्र देऊन केला जातो.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-बेकायदेशीर-घर-जमिनदोस्/

यावर्षी सलग नवव्या वर्षी अश्वमेध तुळस महोत्सव अंतर्गत उद्योगरत्न दादासाहेब परूळकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब आणि उद्योजक सुधीर झांटये  यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपल्या क्षेत्रांत  उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा मानपत्र,शाल,श्रीफळ आणि रोप देऊन  सन्मान करून त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. समाजाला अशा व्यक्तिपासून  प्रेरणा मिळावी यासाठी दरवर्षी अशा व्यक्तीचा सन्मान प्रतिष्ठान कडून केला जातो.  

दशावतारामध्ये ज्यांनी साठ वर्षापेक्षा जास्त काळ सेवा दिली ते जेष्ठ दशावतार श्रीधर मुळीक ,सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये रक्तदान आणि अवयवदान चळवळ राबवणारे प्रकाश तेंडोलकर , दिव्यांग विकासासाठी साहस प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करणाऱ्या रूपाली पाटील , तांदूळ उत्पादनामध्ये राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी शरद धुरी तसेच शिक्षण, क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कै.बाबली विष्णू परुळकर स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार जि.प. उभादांडा शाळा नंबर ०१ चे  उपक्रमशील शिक्षक तथा मुख्याध्यापक झिलू घाडी आणि जि.प.शाळा वेंगुर्ला नंबर ०४ च्या उपक्रमशील  शिक्षिका लीना नाईक- टेमकर यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आल

बाळशास्त्री जांभेकर स्मृती राज्यस्तरीय दर्पण आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार सुरेश कौलगेकर, वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री शिवाजी हायस्कूल, तुळस चे मुख्याध्यापक रामकृष्ण देसाई , सहायक शिक्षक  सानप प्रवीण मालोजी,  त्याचप्रमाणे हिंदी हि राष्ट्रभाषा असल्याने तिच्या प्रचार प्रसिद्धी मध्ये ज्यांनी उल्लेखनीय कार्य केले त्या सरस्वती विद्यालय टाक च्या शिक्षिका आणि तुळस गावच्या स्नुषा श्रध्दा प्रवीण तांडेल, पखवाज विशारद पदवी संपादन केल्याबद्दल आकाश साळगावकर आणि  किरण म्हापणकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. दत्त माऊली दशावतार चे दशावतार कलाकार श्री बाबा मयेकर आणि आजगांवकर दशावतार नाट्य मंडळ चे मालक रमेश आजगावकर यांचा दशावतार क्षेत्रातील योगदानाबद्दल मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. दशावतार कला जनसामान्या  पर्यंत डिजिटल प्रहार च्या मुलाखत सत्रातून पूर्ण महाराष्ट्र आणि जगभरातील दशावतार प्रेमी पर्यंत पोहचविणारे लोककला अभ्यासक वैभव खानोलकर, ब्युरो चीफ सिद्धेश सावंत, पत्रकार राजाराम धुरी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.८वी मध्ये राज्यात २७वी आलेली जागृती दिनेश तुळसकर आणि पूर्व उच्च प्राथमिक  शिष्यवृत्ती परीक्षा इ ५वी शिष्यवृत्तीधारक कस्तुरी दिनेश तुळसकर , एन.एम.एम.एस शिष्यवृती धारक मंदार नाईक, भूपेश गावडे,पुष्कर पेडणेकर, हर्षदा धरणे यांचाही सन्मान करण्यात आला.

फ़ोटो ओळीं

1 पत्रकार सुरेश कौलगेकर याना दर्पण पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करताना सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी सोबत मान्यवर

2 कृषी,दशावतार,शिक्षण, दिव्यांग विकास, पत्रकार, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान करताना मान्यवर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here