Sindhudurg: विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सत्कार संपन्न

0
66
विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सत्कार संपन्न

वेंगुर्ला प्रतिनिधी- राजकारण, समाजकारण आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तिचा उभादांडा येथील प.पू.आई नरसुले समाधी मंदिरात व्यवस्थापक ह.भ.प.मोहनदास नरसुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यामध्ये माजी आमदार नारायण महादेव चमणकर यांचे नातू तथा उभादांडा गावचे विद्यमान सरपंच निलेश जयप्रकाश चमणकरउपसरपंच टिना कार्मिस आल्मेडा, सामाजिक कार्यकर्ते विलास दळवी, वेंगुर्ला नगरवाचनालय संस्थेचा पुरस्कार प्राप्त तथा दै.तरुण भारत डेक्स इनचार्ज अवधूत पोईपकर आणि तालुका पत्रकार संघातर्फे कै.संजय मालवणकर स्मृती आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल वेंगुर्ला येथील पत्रकार प्रथमेश गुरव यांचा समावेश आहे.

या कार्यक्रमाला मंदिराचे व्यवस्थापक ह.भ.प.मोहनदास नरसुले, जि.प.च्या माजी सदस्य सुकन्या नरसुले, गजानन नरसुले, शांतीनिकेतन नरसुले, प्रमिला पोईपकर, ओंकार पोईपकर, पत्रकार भरत सातोसकर, अॅड.चैतन्य दळवी, दुर्गेश भगत, राहूल मोर्डेकर, सोहम भगत, विजय गुरव, सुशेन बोवलेकर, तन्मयी मेळवंकी आदी उपस्थित होते. यावेळी सत्कारमूर्तींनी आपापली मनोगत व्यक्त केली. दरम्यान, उपस्थितांमधून पत्रकार भरत सातोसकर व भजनी बुवा विजय गुरव यांचाही सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here