Sindhudurg: वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर

1
141
वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाचे आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये अरुण काणेकर स्मृती पुरस्कार ‘कोकण प्रभात‘चे संपादक योगेश जयराम तांडेल यांना, संजय मालवणकर स्मृती पुरस्कार ‘दै.लोकमत‘चे वेंगुर्ला प्रतिनिधी प्रथमेश विजय गुरव यांना, पी.ए.केसरकर स्मृती पुरस्कार ‘दै.पुढारी‘चे वार्ताहर अजय अशोक गडेकर यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कांचे वितरण जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

दरम्यान, विविध उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाच्या बैठकीवेळी अध्यक्ष प्रदीप सावंत, उपाध्यक्ष के.जी.गावडे, सहसचिव विनायक वारंग, खजिनदार एस.एस.धुरी, सदस्य योगेश तांडेल, प्रथमेश गुरव, सुरज परब, भरत सातोस्कर, अजय गडेकर व जिल्हा उपाध्यक्ष दाजी नाईक उपस्थित होते. २० जानेवारी रोजी सावंतवाडी तालुका पत्रकार संघातर्फे होणा-या पत्रकारांसाठीच्या जिल्हास्तरीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेसाठी वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाचा क्रिकेट संघ सहभाग होणार असून यासाठी संघ निवड या बैठकीत करण्यात आली.

फोटो – यगेश तांडेलप्रथमेश गुरवअजय गडेकर

1 COMMENT

  1. […] वेंगुर्ला प्रतिनिधी- नगर वाचनालय संस्थेतर्फे पत्रकारिता, साहित्य, ग्रंथालय क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-यांना पुरस्कार दिले जातात. यात सन २०२२-२३ साठीच्या पुरस्कारांमध्ये दै.तरुण भारतचे डेक्स इन्चार्ज अवधूत पोईपकर (सावंतवाडी) यांना आदर्श पत्रकार पुरस्कार, गजानन वालावलकर (मालवण) यांना ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार, वीरधवल परब (वेंगुर्ला) यांना साहित्यिक पुरस्कार तर राजन पांचाळ (कुडाळ) यांना ग्रंथालय कर्मचारी पुरस्कार जाहीर झाले आहेत. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख ५ हजार असे पुरस्कारांचे स्वरुप आहे. या पुरस्कारांचे वितरण २२ जानेवारी रोजी नगरवाचनालय सभागृहात मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेंगुर्ला-तालुका-पत्र… […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here