Sindhudurg : वेंगुर्ला तालुक्यातील सहा शाळा दाखविणार जिल्हास्तरावर कसब

0
48
तालुक्यातील सहा शाळा दाखविणार जिल्हास्तरावर कसब

वेंगुर्ला प्रतिनिधी – वेंगुर्ला तालुकास्तरीय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव २०२२ या महोत्सवात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या तालुकास्तरीय स्पर्धेत घेतलेल्या तीन स्पर्धांमध्ये १८ शाळा सहभागी झाल्या होत्या. त्यापैकी ६ शाळांची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.

सिद्धिविनायक मंगल कार्यालयात पार पडलेल्या या स्पर्धेत विजयी ठरलेल्या शाळांमध्ये ‘‘ज्ञानी मी होणार‘‘लहान गट-शाळा पिंपळाचे भरड (तुळस प्रभाग), मोठा गट-परबवाडा नं.१ (वेंगुर्ला प्रभाग), समुहगीत स्पर्धेत लहान गट -तुळस वेताळ (तुळस प्रभाग) मोठा गट- वजराट नं.१ (तुळस प्रभाग) तर समुहनृत्य स्पर्धेत लहान गट – वेंगुर्ला शाळा नं.४ (वेंगुर्ला प्रभाग), मोठा गट – आडेली नं.१ (तुळस प्रभाग) यांचा समावेश आहे. या सहा शाळांची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी यांच्यासह मान्यवर शिक्षकांच्यावतीने या गुणवंत विद्यार्थी व शाळांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

फोटोओळी – जिल्हास्तरावर निवड झालेल्या वेंगुर्ला नं.४ला गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here