Sindhudurg: वेंगुर्ला नगरवाचनालयाचे पुरस्कार जाहीर

1
133
वेंगुर्ला प्रतिनिधी- नगर वाचनालय संस्थेतर्फे पत्रकारिता, साहित्य, ग्रंथालय क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-यांना पुरस्कार दिले जातात. यात सन २०२२-२३ साठीच्या पुरस्कारांमध्ये दै.तरुण भारतचे डेक्स इन्चार्ज अवधूत पोईपकर (सावंतवाडी) यांना आदर्श पत्रकार पुरस्कार, गजानन वालावलकर (मालवण) यांना ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार, वीरधवल परब (वेंगुर्ला) यांना साहित्यिक पुरस्कार तर राजन पांचाळ (कुडाळ) यांना ग्रंथालय कर्मचारी पुरस्कार जाहीर झाले आहेत. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख ५ हजार असे पुरस्कारांचे स्वरुप आहे. या पुरस्कारांचे वितरण २२ जानेवारी रोजी नगरवाचनालय सभागृहात मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. आदर्श पत्रकार पुरस्कार अनिल सौदागर यांनी आपले वडील श्रीकृष्ण सखाराम सौदागर यांच्या स्मरणार्थ पुरस्कृत, साहित्यिक पुरस्कार हा टक येथील टककर-शेटये ट्रस्टने रमाकांत गुरुनाथ शेटये स्मृती पुरस्कृत, ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार अनिल सौदागर यांनी आपली आई सौ.सुशिला श्रीकृष्ण सौदागर स्मृति प्रित्यर्थ पुरस्कृत तर आदर्श ग्रंथालय कर्मचारी पुरस्कार श्रीकृष्ण सखाराम सौदागर स्मृति प्रित्यर्थ पुरस्कृत केला आहे.

वेंगुर्ला प्रतिनिधी- नगर वाचनालय संस्थेतर्फे पत्रकारिता, साहित्य, ग्रंथालय क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-यांना पुरस्कार दिले जातात. यात सन २०२२-२३ साठीच्या पुरस्कारांमध्ये दै.तरुण भारतचे डेक्स इन्चार्ज अवधूत पोईपकर (सावंतवाडी) यांना आदर्श पत्रकार पुरस्कार, गजानन वालावलकर (मालवण) यांना ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार, वीरधवल परब (वेंगुर्ला) यांना साहित्यिक पुरस्कार तर राजन पांचाळ (कुडाळ) यांना ग्रंथालय कर्मचारी पुरस्कार जाहीर झाले आहेत. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख ५ हजार असे पुरस्कारांचे स्वरुप आहे. या पुरस्कारांचे वितरण २२ जानेवारी रोजी नगरवाचनालय सभागृहात मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेंगुर्ला-तालुका-पत्रक/

      आदर्श पत्रकापुरस्कार अनिल सौदागर यांनी आपले वडील श्रीकृष्ण सखाराम सौदागर यांच्या स्मरणार्थ पुरस्कृत, साहित्यिक पुरस्कार हा टक येथील टककर-शेटये ट्रस्टने रमाकांत गुरुनाथ शेटये स्मृती पुरस्कृत, ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार अनिल सौदागर यांनी आपली आई सौ.सुशिला श्रीकृष्ण सौदागर स्मृति प्रित्यर्थ पुरस्कृत तर आदर्श ग्रंथालय कर्मचारी पुरस्कार  श्रीकृष्ण सखाराम सौदागर स्मृति प्रित्यर्थ पुरस्कृत केला आहे.

फोटो – अवधूत पोईपकरगजानन वालावलकरवीरधवल परबराजन पांचाळ

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here