वेंगुर्ला प्रतिनिधी- परस्परातील राग, मत्सर विसरुन सर्वांमध्ये आपुलकी, प्रेम नांदावे हा येशुचा संदेश देण्यासाठी ख्रिसमसच्या निमित्ताने शांतता फेरी काढली जाते. वेंगुर्ला भाजपचे तालुका उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस व भाजपा अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष सायमन आल्मेडा यांच्या माध्यमातून परबवाडा – मासुरेवाडी येथे शांतता फेरीचे आयोजन केले होते. या शांतता फेरीत भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सहभागी होत नाताळच्या शुभेच्छा दिल्या.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-राष्ट्रीय-सेवा-योजना-वि/
यावेळी भाजपाचे प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, पपू परब, हेमंत गावडे, इनासिन फर्नांडीस आदी उपस्थित होते. तर शांतता फेरीत शिरील आल्मेडा, निकलस फर्नांडीस, विल्सन फर्नांडीस, दुवाट फर्नांडीस, वॉल्टर डिसोजा, आना डिसोजा, ग्लॅसीस फर्नांडीस, सिल्व्हीया आल्मेडा आदी ख्रिस्ती बांधव सहभागी झाले होते.
फोटोओळी – परबवाडा येथील शांतता फेरीत सहभागी होत राजन तेली यांनी ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा दिल्या.
[…] मुंबई : महावितरणच्या वीज देयकांच्या अर्थात बिलिंगच्या बाबतीत आर्थिक वर्ष २०२० -२१ मध्ये १०.२२ लाख तक्रारी आल्या होत्या व ती संख्या डिसेंबर २०२२ पर्यंत २.७२ लाख इतकी कमी झाली आहे. बिलिंगमध्ये गुणात्मक सुधारणा दिसत असून अतिशय चांगले काम केल्याबद्दल आपण महावितरणचे अभिनंदन करतो, असे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी नागपूर येथे विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या दरम्यान सांगितले. http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेंगुर्ला-येथे-ख्रिसम… […]