Sindhudurg: वेंगुर्ला लिनेसच्या पदाधिका-यांना शपथ प्रदान

1
70

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला लिनेस क्लबचा पदग्रहण सोहळा ८ जानेवारी रोजी गुरुलिला निवास येथे संपन्न झाला. शपथप्रदान अधिकारी म्हणून लिनेस च्या जेष्ठ पदाधिकारी प्राची मणचेकर व अध्यक्षस्थानी कुडाळ येथील जेष्ठ समाजसेविका अस्मिता बांदेकर उपस्थित होत्या. उपस्थितांचे स्वागत हेमा गावस्कर यांनी केले.  http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-रस्ता-सुरक्षा-सप्ताह-का/

अध्यक्ष उर्मिला सावंत यांनी घंटानाद करून प्रतिज्ञा वाचन केले. सुषमा प्रभूखानोलकर यांनी सेक्रेटरी अहवाल व कविता भाटिया यांनी खजिनदाराचा अहवाल सादर केला. प्राची मणचेकर यांनी नवनिर्वाचित अध्यक्षा अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, सेक्रेटरी स्मिता कोयंडे, खजिनदार कविता भाटिया, उपाध्यक्ष हेमा गावस्कर यांना तसेच कार्यकारिणी सदस्य निला यरनाळकर, दिशा कर्पे, बिना भाटिया, मंदाकिनी सामंत, शर्मिला मठकर, अश्विनी नायक, डॉ.वसुधा मोरे, श्रद्धा बेलवलकर, अंजली धुरी यांनी शपथ घेतली.

यावेळी वेंगुर्ला नगरपरिषदेत उत्तम कामगिरी बजावलेल्या दिलीप गिरप यांचा व ॐ योग साधनेच्या माध्यमातून योगाचा प्रचार व प्रसार करणा-या साक्षी बोवलेकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. अस्मिता बांदेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. नवनिर्वाचित कार्यकारिणीला शुभेच्छा देण्यासाठी इनरव्हील पदाधिकारी वृंदा गवंडळकर, सावंतवाडी येथील नंदा पोकळे, अनिता पाटील, सुजाता परब, वैभवी नेवगी, उमा चोडणकर व कुडाळ येथून लायन नयन भणगे, स्नेहा नाईक उपस्थित होत्या.

फोटोओळी – लिनेसच्या शपथप्रदान सोहळ्याप्रसंगी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

1 COMMENT

  1. […] मुबंई- कोयना भूकंपग्रस्त आठ तालुक्यांसाठी असलेल्या कोयना पुनर्वसन न्यासाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत माझ्या आग्रही मागणीनुसार या आठ तालुक्यांसाठी प्रत्येक अर्थसंकल्पात १०० कोटींचा निधी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे, अशी माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेंगुर्ला-लिनेसच्या-प… […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here