वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला शहरातील वॉर्ड नं.७ मधील आनंदवाडी ते पॉवर हाऊस समोरील गटार उघडे असल्याने ते धोकादायक ठरत असून त्याकडे वेंगुर्ला नगरपरिषदेचा पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अॅड.मनिष सातार्डेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-राज्यस्तरीय-सन-२०२२-चा-द/
त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, आनंदवाडी ते पॉवर हाऊस समोरील गटाराचे काम सन २०१९-२०च्या दरम्याने झाले आहे. त्यावेळी त्या गटारांची खोली व रुंदी वाढविण्यात आली. परंतु, हे काम अर्धवट अवस्थेत आहे. या गटाराची खोली व रुंदी वाढविण्यात आल्याने आणि त्यावर झाकण नसल्याने हे गटार धोकादायक बनत असून येथे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच रस्त्याचा अंदाज न आल्यास वाहनचालकांनाही याचा त्रास होऊ शकतो. याच मार्गावरुन पादचारी तसेच शाळकरी मुले देखील जात असल्याने त्यांच्यासाठी देखील हे उघडे गटार धोकादायक आहेत. त्यामुळे हे गटार त्वरित बंद करावेत. तसेच या उघड्या गटारांमुळे अपघात झाल्यास त्यास केवळ नगरपरिषद आणि संबंधित अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा अॅड.सातार्डेकर यांनी दिला आहे.
फोटोओळी – आनंदवाडी येथील रस्त्यावर अशाप्रकारे गटार उघडे आहेत.