Sindhudurg: वेंगुर्ले तालुक्यात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते टी-शर्ट वाटप

1
123
वेंगुर्ले तालुक्यात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते टी-शर्ट वाटप

वेंगुर्ला प्रतिनिधी

वेंगुर्ले तालुक्यातील बाळासाहेबांची शिवसेना गटाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांना  शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे फोटो असलेले टी-शर्ट याचे वाटप करण्यात आले. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सुभाष-साबळे-डॉ-सर्वपल्ल/

बाळासाहेबांची शिवसेना यांचे वेंगुर्ले तालुक्यात नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांचा सत्कार कार्यक्रम नुकताच सावंतवाडी येथे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी बाळासाहेबांची शिवसेना वेंगुर्ले तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांच्या संकल्पनेतून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवण्यासाठी आगळीवेगळी संकल्पना म्हणून मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांचे फोटो असलेले टी-शर्ट बनविण्यात आले.https://sindhudurgsamachar.in/कर्नाटकचे-मुख्यमंत्री-आ/

 या टी-शर्ट मधून बाळासाहेबांची शिवसेना सदस्य व पदाधिकारी यांना एक वेगळी ओळख निर्माण होईल व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढेल तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर हे संघटना वाढीसाठी विविध संकल्पना आखत असून या टी-शर्टच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांना शिवसेना पक्ष वाढविण्यासाठी वेगळी ताकद मिळेल वेंगुर्ले तालुक्यात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सरपंच व सदस्य यांना जास्तीत जास्त निधी दिला जाईल असे ही शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बोलताना सांगितले 

 कार्यक्रमाच्याप्रसंगी वेंगुर्ला शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, सावंतवाडी शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, संघटक सचिन देसाई ,शहर प्रमुख सचिन वालावलकर ,आडेली सोमेश्वर सोसायटीचे माजी चेअरमन समीर कुडाळकर , श्री कोंडसकर,राजेश सामंत आडेली सरपंच यशस्वी कोंडसकर, आदी उपस्तीत होते.

फ़ोटो ओळी

मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांचे फोटो असलेले टी-शर्ट चे अनावरण करताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर सोबत शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर आधी

1 COMMENT

  1. […] नागपूर दि. २९ डिसेंबर – तत्कालीन महसूल राज्यमंत्री आणि विद्यमान कृषीमंत्री यांनी गायरान जमीन नियमबाह्य पद्धतीने वाटप केली असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला असल्याने विद्यमान मंत्र्यांची सखोल चौकशी करा आणि चौकशी होईपर्यंत मंत्री पदाचा राजीनामा घ्या अशी जोरदार मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज स्थगन प्रस्तावाद्वारे केली. http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेंगुर्ले-तालुक्यात-श… […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here