वेंगुर्ला प्रतिनिधी- भटवाडी येथील बाल गणेश कला-क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या बालचमूंनी केलेल्या राजगड किल्ल्याला राज्यस्तरावर प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे. याबद्दल भटवाडी ग्रामस्थांनी मुलांचे भेटवस्तू देऊन कौतुक केले.
शिवसृष्टी पुणे आयोजित ‘गड किल्ल्यांचे करूया संवर्धन, ऐतिहासिक वास्तूचे करूया जतन ‘ या राज्यस्तरीय ऑनलाईन किल्ले बांधणी स्पर्धेत वेंगुर्ल्यातील भटवाडी येथील बालगणेश कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या बालचमूचा सहभाग होता. या स्पर्धेत राज्यातून वयोगटनुसार एकूण २७० संघ सहभागी सहभागी झालेले होते. तर तिस-या गटातील १०६ संघातून भटवाडी येथील बाल गणेश कला-क्रीडा व सांस्कृतिक मंडळाने प्रथम क्रमांक मिळविला.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-पिरामल-एंटरप्राइजेसच्/
सवेश सादरीकरणाने बनवलेल्या राजगड किल्ल्याविषयी माहिती देताना किल्ल्यावरील तटबंदी, पाण्याची सोय दरवाजे, तोफखाना याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी त्यांनी स्वराज्य रक्षणासाठी निवडलेले किल्ले, तयार केलेले मावळे यांची राज्यस्तरीय किल्ला बांधणी स्पर्धा २०२२ यामध्ये सहभागी होत केलेल्या राजगड किल्ल्याची माहिती उत्स्फूर्तपणे दिली. हा किल्ला बनविताना स्वच्छतेचे महत्त्व, शिक्षणाचे महत्त्व सांगणारे फलक स्वतः तयार करीत मुलांनी सुशोभीकरण ही केले होते.
चैतन्य केसरकर, ईशिता माईणकर, यश्मित सातार्डेकर, केतकी आपटे, चिन्मय पेडणेकर, कृत्तिका माईणकर, यशश्री केसरकर, तन्मय सातार्डेकर, हर्षल परब, वेदांत सातार्डेकर, सानिका पेडणेकर, भूमिका परब, सानिका वरसकर, अमिषा आडणेकर, संजना पेडणेकर, चिन्मयी पेडणेकर, काजल निकम, गौरव सातार्डेकर, गितेश वरसकर, गौरव वरसकर, अक्षय पेडणेकर या लहान मुलांनी किल्ला बनविण्यासाठी सहभाग घेतला. या सर्वांना बिपिन वरसकर, लक्ष्मण केसरकर, राघोबा केसरकर, पविण सातार्डेकर, पशांत आपटे, सुनिल नांदोसकर, रोहन नांदोसकर, निलेश भगत, नारायण पेडणेकर, अशोक पेडणेकर, विनोद वरसकर यांनी विशेष कौतुक करीत अभिनंदन केले.
फोटोओळी – राजगड किल्ल्याला राज्यस्तरावर प्रथम प्राप्त झाल्याबद्दल भटवाडी ग्रामस्थांनी मुलांचे भेटवस्तू देऊन कौतुक केले.