Sindhudurg: शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,इंग्लिश मिडीयम स्कूल शिरगाव व कर्ले कला, वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालय यांचा प्रजाकसत्ताक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

1
195
शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,इंग्लिश मिडीयम स्कूल शिरगाव व कर्ले कला, वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालय यांचा प्रजाकसत्ताक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

प्रतिनिधी- पांडुशेठ साठम

🇮🇳 देवगड– देशाचा ७४ वा प्रजासत्ताक दिन गुरुवार दिनांक २६ जानेवारी २०२३ रोजी शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिरगावच्या प्रांगणात सकाळी ठीक ८.१० वाजता मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनी सर्व संस्था पदाधिकारी, सदस्य, सर्व शाळांचे व महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थितीत होते. https://sindhudurgsamachar.in/kolhapur-पंचगंगेतही-लवकरच-नौकान/

मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या एस एस सी परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या कुमारी सांची माधव साटम यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात आला. या वेळी एन सी सी ग्रुप चे संचलन झाले. त्या नंतर एन सी सी च्या मधील बेस्ट कॅडेटना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. तसेच या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या तीन विद्यार्थ्याचेही साटम क्लास यांच्या तर्फे रोख रक्कम व पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या वेळी शिरगाव हायस्कूल मधील माजी राज्य पुरस्कार प्राप्त दोन विद्यार्थिनींनाही प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

या वेळी वरिष्ठ महाविद्यालयाने एक समूह गीत सादर केले. तसेच शिरगाव हायस्कूलने तयार केलेल्या चार भित्ती पत्रकाचे व वरिष्ठ महाविद्यालयाच्या दोन भित्तीपत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. माननीय सदानंद तावडे यांच्या हस्ते वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन फित कापून करण्यात आले. त्यानंतर सर्व उपस्थित ग्रामस्थ, संस्था पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा चहापान कार्यक्रमाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here