Sindhudurg: शिवजयंती निमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

0
111
शिवजयंती निमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

वेंगुर्ला प्रतिनिधी- बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय यांचेमार्फत ग्रंथालय उपक्रमांतर्गत शिवजयंतीचे औचित्य साधून १७ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ९ वाजता जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा इयत्ता दहावीपर्यंतचा शालेय गट व खुला गट अशा दोन गटांमध्ये होणार आहे. http://sindhudurgsamachar.in/maharashtra-रूफ-टॉप-सोलरला-वीज-ग्राह/

 शालेय गटासाठी राजमाता जिजाऊःएक अलौकिक व्यक्तिमत्व‘ व खुल्या गटासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ः स्वराज्याची गरज‘ हे विषय ठेवण्यात आले आहेत. शालेय गटासाठी किमान पाच ते सात मिनिटे व खुल्या गटासाठी किमान आठ ते दहा मिनिटे वेळ आहे.

शालेय गटातील विजेत्यांना अनुक्रमे १०००, ७५०, ५००, ३००ची दोन, तर खुल्या गटातील विजेत्यांना १५००, ११००, ७५० व ५००ची दोन अशी बक्षिस ठेवण्यात आली आहेत. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येईल. स्पर्धेत प्रवेश घेण्यासाठी संजय पाटील (९८९०६९४७०९) व सुनील आळवे (९४२१६३११४७) यांच्याशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. विलास देऊलकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here