Sindhudurg: शिवसेना पावशी महिला विभाग संघटकपदी मृणाल परब तर पिंगुळी महिला विभाग संघटकपदी निर्मला पालकर यांची नियुक्ती

0
29
पिंगुळी महिला विभाग संघटकपदी निर्मला पालकर यांची नियुक्ती

आमदार वैभव नाईक यांनी नियक्ती पत्रे देत केले अभिनंदन

कुडाळ– शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक कुडाळ येथे आज संपन्न झाली.यावेळी आमदार वैभव नाईक यांनी महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी पावशी विभागाच्या महिला विभाग संघटक पदी मृणाल परब तर पिंगुळी विभागाच्या महिला विभाग संघटक पदी निर्मला पालकर यांची नेमणूक करण्यात आली. आ. वैभव नाईक यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्रे देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हि बैठक संपन्न झाली. http://sindhudurgsamachar.in/दूरदर्शनच्या-मोफत-वाहिन्/

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे शिवसेना कुडाळ तालुका महिला संघटक मथुरा राऊळ, तालुका संघटक स्नेहा दळवी, माजी उपसभापती श्रेया परब, नगरसेविका श्रेया गवंडे, ज्योती जळवी, श्रुती वर्दम, विभागप्रमुख कन्याश्री मेस्त्री, दर्शना म्हसकर, माणगाव सरपंच मनीषा भोसले, पुळास सरपंच विनया निकम,नेरूर सरपंच भक्ती घाडीगावकर,पावशी सरपंच वैशाली पावसकर, तेंडोली सरपंच अनघा तेंडोलकर , पोखरण-कुसबे सरपंच समीक्षा जाधव, श्रावणी सावंत, रश्मी वेंगुर्लेकर,सायली सर्वेकर, रोशनी नाईक आदी शिवसेनेच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

           

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here