Sindhudurg: सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ सिंधुदुर्गच्यावतीने भंडारी समाज कुटुंबाच्या जनगणनेचा १ जानेवारीला शुभारंभ

0
146
सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ सिंधुदुर्गच्यावतीने भंडारी समाज कुटुंबाच्या जनगणनेचा १ जानेवारीला शुभारंभ

वेंगुर्ला प्रतिनिधी- सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ सिंधुदुर्गच्यावतीने १ जानेवारी २०२३ रोजी देवगड-सडा येथे सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ व देवगड तालुका भंडारी समाज मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्य भंडारी समाज कुटुंबाच्या जनगणनेचा मुख्य कार्यक्रमाचे अनुषंगाने भव्य रक्तदान, मोफत नेत्रतपासणी शिबिराचे व नवानिर्वाचित सरपंच व सदस्यांचा गौरव अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर यांनी पत्रकार परीषदेत दिली. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-स्वच्छतेतील-खेळही-मुला/

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ सिंधुदुर्गच्यावतीने देवगड-सडा येथे रविवार दि. १ जानेवारी २०२३ रोजी भव्य दिव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  १ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता देवगड-सडा येथे रक्तदान शिबिर आणि त्याच ठिकाणी डॉ.सुनिल आठवले मेडिकल फाऊंडेशनच्यावतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. हे संपूर्ण कार्यक्रम प्रसिद्ध उद्योगपती व दानशूर व्यक्तिमत्व बाबू सावंत यांच्या सौजन्याने होणार आहे. त्याच दिवशी त्याच ठिकाणी जिल्हा महासंघाने काढलेल्या सन २०२३ च्या कॅलेंडरचे अनावरणही केले जाणार आहे. या भंडारी समाज महासंघाने समाजातील गरजू व्यक्तींसाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमांचा बहुसंख्येने लाभ घ्यावा असे आवाहन रमण वायंगणकर यांनी केले आहे.

तसेच भंडारी समाजातील कुटुंबांची जनगणना कार्यक्रमाचा शुभारंभ याच ठिकाणी करण्यात येणार आहे व तालुक्यातील भंडारी समाजाचे नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांच्या सत्काराचा कार्यक्रम होणार आहे. महासंघाच्या सर्व पदाधिकारी व सदस्यतालुक्याचे सर्व पदाधिकारी व सदस्य, तसेच समाजबांधव यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघातर्फे जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर यांनी केले आहे.

फोटो – रमण वायंगणकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here