Sindhudurg: स्वच्छतेतील खेळही मुलांपर्यंत पोहचवा – मुख्याधिकारी कंकाळ

0
175
स्वच्छतेतील खेळही मुलांपर्यंत पोहचवा - मुख्याधिकारी कंकाळ

वेंगुर्ला प्रतिनिधी- स्वच्छतेच्या बाबतीत वेंगुर्ला शहर अग्रेसर झाली आहे. तशीच खेळांमध्ये वेंगुर्ला आपले नाव कमवेल. स्वच्छतेची सवय मुलांमध्ये लागावी यासाठी या पारंपारिक खेळाबरोबरच वेंगुर्ला नगरपरिषदेने स्वच्छतेतील काही खेळ काढले आहेत. तेही खेळ ‘माझा वेंगुर्ला‘ने मुलांपर्यंत पोहचवावेत असे आवाहन ‘खेळ आठवणीतले‘ या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-राष्ट्रीय-सेवा-योजना-वि/

‘माझा वेंगुर्ला‘ तर्फे कॅम्प येथील नगरपरिषदेच्या क्रीडांगणावर आयोजित केलेल्या ‘खेळ आठवणीतले‘ या उपक्रमाचे उद्घाटन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते २४ डिसेंबर रोजी झाले. यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, जगन्नाथ सावंत, पंचायत समितीचे माजी सभापती जयप्रकाश चमणकर, लोकमान्य सोसायटीचे पुरुषोत्तम राऊळ, प्रसिद्ध चित्रकार सुनिल नांदोसकर, मुक्तांगणच्या संचालिका मंगल परुळेकर, हॉटेल व्यावसायीक शैलेश शिरसाट, माझा वेंगुर्लाचे राजन गावडे आदी व्यासपिठावर उपस्थित होते.  तिन दिवस चालणा-या या खेळांमध्ये पहिल्या दिवशी खो-खो, लंगडी, आट्यापाट्या, तळ्यात-मळ्यात, काजूंचे खेळ, लगोरी, आट्याकाट्या, ताईचा रुमाल, टायरने खेळणे, विटीदांडू आदी पारंपारिक खेळ खेळण्यात आले. यावेळी बहुसंख्य पालक आपल्या मुलांना घेऊन या खेळामध्ये सहभागी झाले होते.

फोटोओळी – खेळ आठवणीतले या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्याधिकारी कंकाळ यांनी मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here