ठाणे (विश्वनाथ पंडित) – मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा अजूनही मिळाला नसल्याचे खंत व्यक्त करीत असताना ते पुढे म्हणाले मराठी ज्ञानभाषा होण्यात अडचणी येत असल्या तरी सातत्य ठेवल्यास निश्चितच यश मिळेल असा विश्वास माजी साहित्य संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांनी ठाणे येथे आयोजित कोकण साहित्य परिषद आणि मराठी ग्रंथ संग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा वृध्दींगत करण्यासाठी उपाय योजना या विषयावरील निबंध स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी ठाणे येथील मराठी ग्रंथ संग्रहालयात नुकताच पार पडलेल्या समारंभात व्यक्त केला. आपल्या अध्यक्षीय भाषणात ते पुढे म्हणाले मराठी भाषेचा विस्तार केवळ राज्यातच नव्हे तर मराठी बांधव स्थायिक झालेल्या विविध देशातही झालेला आहे. यावेळी त्यांनी मराठी भाषा निर्मिती पासून ते आत्तापर्यंतची मराठी भाषेची स्थित्यंतरे संक्षिप्तपणे आपल्या मौलिक भाषणात सांगितली.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-गुरु-रविदास-यांचे-बरोबर/
जेष्ठ साहित्यिक अनंत देशमुख, कोमसापचे केंद्रिय कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.प्रदिप ढवळ, कोमसापचे ठाणे शहर अध्यक्ष मनोज वैद्य, मराठी ग्रंथ संग्रहालय, अध्यक्ष, विद्याधर ठाणेकर तसेच बाळ कांदळकर व्यासपीठावर उपस्थीत होते.
कोपसापचे ठाणे शहर अध्यक्ष मनोज वैद्य, मनोदय व्यक्त करतान म्हणाले निबंध स्पर्धेतुन प्राप्त झालेल्या, लेखांचे पूस्तक तयार करून मराठी भाषा वृध्दीसाठी शासनाला सादर करण्यात येईल.
या स्पर्धेसाठी ठाणे जिल्हा- महाराष्ट्र, तर परराज्यातूनही निबंध प्राप्त झाले. त्यातुन प्रथम, द्वितीय, आणि तृतीय अश्या तीन विजेत्या स्पर्धेकांची निवड करण्यात आली. विजेत्या स्पर्धेकांचा मानचिन्ह व मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. प्रथम क्रमांकाचे मानकरी ठाण्याचे वृत्तपत्र लेखक नितिन आंबवणे ठरले. सर्व सहभागी स्पर्धकांना मानपत्र देवून गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वृंदा दाभोळकर यांनी केले साहित्यिक,लेखक, साहित्यप्रेमी नागरिक यांची उपस्थिती लक्षणीय होती.