Sindhudurg: जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत साक्षी तुळसकर प्रथम

0
114
जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत साक्षी तुळसकर प्रथम

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला तालुक्यातील समाजसेवी व्यक्तिमत्व म्हणून परिचित असणारे जयप्रकाश चमणकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत उभादांडा न्यू इंग्लिश स्कूलच्या कु.साक्षी तुळसकर हिने प्रथम तर रोशनी मोटे हिने द्वितीय नंबर पटकावला.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-मराठी-भाषेला-अभिजात-भाष/

रोशनी मोटे

 साक्षी तुळसकर हिने सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल भाष्य करत त्या काळातील समाजसुधारणेचा वसा घेणा-या सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा वेध घेतला तर कु.रोशनी मोटे हिने थोर समाजसुधारक महात्मा फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. त्यांना  प्रा.वैभव खानोलकर आणि या लिपिक अजित केरकर यांनी मार्गदर्शन केले. सर्वांचे मुख्याध्यापक उमेश वाळवेकर, संस्थाध्यक्ष विरेंद्र कामत-आडारकर, उपाध्यक्ष रमेश पिगुळकर, सचिव रमेश नरसुले यांच्यासह शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

फोटो – साक्षी तुळसकर, रोशनी मोटे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here