Sindhudurg: वजराट येथे ३१ जणांचे रक्तदान

0
121
वजराट येथे ३१ जणांचे रक्तदान

वेंगुर्ला प्रतिनिधी- ग्रामपंचायत वजराट, श्री सातेरी वाचनालय व गुरुमाऊली माई मांजरेकर ग्रंथ संग्रहालय, वजराट यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत वजराट सभागृहात रक्तदान शिबिर पार पडले.  यामध्ये वजराट व आडेली गावातील पुरुष व महिला अश्या एकूण ३१ दात्यांनी रक्तदान केले. उद्घाटन डॉ. संजीवनी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-जिल्हास्तरीय-वक्तृत्व/

 यावेळी वजराट उपसरपंच प्रियांका केरकर, ग्रामपंचायत सदस्य दिपिका राणे, नयना धुरी, नम्रता देसाई, शामसुंदर पेडणेकर, नामदेव कांदे, तसेच डॉ. अशोक परब, आरोग्यसेवक शेखर कांबळी, बाबुराव परब, वसंत पेडणेकर, चंद्रकांत परब, मनोहर परब, दिगंबर पेडणेकर, चंद्रशेखर सोनसुरकर, शेखर परब, अ. बा. परब, आनंद परब उपस्थित होते.

सावंतवाडी रक्तपेढीचे डॉ.अटक, प्राजक्ता रेडकर, अनिल खाडे, मानसी बागेवाडी, प्रसाद जाधव यांचे बहुमोल सहकार्य लाभले. या रक्तदान शिबिरासाठी आनंद पुराणिक, वसंत पेडणेकर, प्रमानंद सावंत-भोसले, संदीप पेडणेकर, बाळकृष्ण सोनसूरकर यांचे आर्थिक सहाय्य लाभले. तसेच शिबिराच्या यशस्वी नियोजनासाठी पांडुरंग दळवी, साईप्रसाद केरकर, मकरंद गोंधळेकर, प्रथमेश पेडणेकर, नितीन सावंत, रामकृष्ण देसाई, प्रविण गावडे, रविद्र मोरे, साईनाथ कांदे यांनी मेहनत घेतली.

फोटोओळी – वजराट येथील रक्तदान शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here