Sindhudurg: मास्टर ट्रेनर प्रशिक्षण शिबीरासाठी क्रीडा शिक्षकांनी अर्ज करण्याचे आवाहन

1
372
मास्टर ट्रेनर प्रशिक्षशिबीरासाठी क्रीडा शिक्षकांनी अर्ज करण्याचे आवाहन

ओरोस: सन 2022-23 या वर्षात राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार आहे. कोविड-19 प्रादुर्भावामुळे क्रीडा शिक्षकांचे प्रशिक्षण शिबिर कार्याक्रम झाले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील अनुदानित, विनाअनुदानित उच्च माध्यमिक, माध्यमिक व प्राथमिक शाळा, आश्रमशाळांमधील क्रीडा विषयक अर्हता धारण करणाऱ्या व किमान 10 वर्षे सेवा शिल्लक असलेल्या शिक्षकांकडून मास्टर ट्रेनर प्रशिक्षण शिबीरासाठी 20 ऑक्टोबर 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुकांनी आपल्या आवश्यक कागदपत्रांच्या प्रतींसह विहित नमुन्यातील अर्ज सादर करावेत. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-विलासराव-देशमुख-अभय-योज/

राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवार्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण असणे आवश्यक आहे. या भूमिकेतून राज्याचे क्रीडा धोरण 2012 घोषित करण्यात आलेले आहे. या क्रीडा धोरणातील मुद्दा क्र.6(5) नुसार खेळामधील बदलेले आधूनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षणाच्या पध्दती, नवीन खेळ, खेळांची शास्त्रोक्त माहिती वेळोवेळी शिक्षाकांना होणे आवश्यक आहे. तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्त्रावर क्रीडा शिक्षकांच्या ज्ञानात भर पडावी व वेळोवेळी क्रीडा प्रशिक्षण मिळण्यासाठी क्रीडा शिक्षकांचे अद्यायावत प्रशिक्षण असणे आवश्यक आहे. यासाठी राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर प्रशिक्षण शिबीर कार्याक्रम आयोजीत करण्यात आला आहे.तरी पात्र शिक्षकांनी अर्ज सादर करावेत असे आवाहन,जिल्हा क्रीडा अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-महिला-हवालदारावर-प्राण

1 COMMENT

  1. […] काही झालं तरी प्रोफेशनली आपल्याला टिकायचे तर समोरचा पक्ष फोडला पाहिजे हा उद्देश ठेवून भाजपने शिवसेना फोडली तसे कारस्थान रचण्यात आले. आता नावही आणि चिन्हही काढून घेण्यात आले. त्यामुळे उध्दव ठाकरे यांच्या घरातील शिवसेना चोरीला गेली आणि ती कुणाच्या घरात गेली हे थोड्या दिवसात समोर येईल म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्याची व्यवस्था आयोगाच्या माध्यमातून होईल यात शंका नाही असा थेट आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडाळीची कबुलीच दिल्यामुळे अर्थ स्पष्ट आहे की, शिवसेना फोडण्याचे आणि बाळासाहेबांच्या पक्षाचे दोन तुकडे करण्याचे कारस्थान भाजपने केले आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-मास्टर-ट्रेनर-प्रशिक्… […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here