Sindhudurg: वेंगुर्ला नगरपरिषदेच्या प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल यांचा सन्मानपत्राने सन्मान

5
428

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला शहराच्या सर्वांगिण विकासासाठी तळमळीने काम करणा-या वेंगुर्ला नगरपरिषदेच्या प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल यांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन जनजागृती सेवा समिती, महाराष्ट्रतर्फे सन्मानपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले आहे.https://sindhudurgsamachar.in/sinbdhudurg-सिंधुदुर्ग-जिल्ह्यात-क/

ठाणे येथील जनजागृती सेवा समिती, महाराष्ट्र ही सामाजिक संस्था दरवर्षी समाजात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींचा सन्मानपत्र देऊन गौरव करत असते. यावर्षी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल यांना सन्मानपत्र देण्यात आले. सौ. कुबल या स्वच्छतेच्या महायज्ञामध्ये काम करणा-या स्वच्छता कर्मचा-यांबरोबरच कार्यालयात येणा-या नागरिकांना योग्य सेवा हसतमुखाने देत आहेत. तसेच कोरोना काळातही पॉझिटीवह मिळणा-या रुग्णांना संफ करणे, त्यांना योग्य वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देणे, रुग्णांची वेग्गळी व्यवस्था करणे, त्यांना लागणारे अन्नधान्य-औषधे पुरविणे, अशा रुग्णांच्या कुटुंबियांकडे आपुलकीने लक्ष देणे अशी सर्वच जबाबदारी संगीता कुबल यांना प्रामाणिकपणे सहकारी, लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या समवेत पार पाडली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हे सन्मानपत्र देण्यात आले आहे.

सांस्कृतिक, शैक्षणिक, कला, क्रिडा, आरोग्य, महिला सक्षमिकरण, वृक्ष संवर्धन, संरक्षण, पर्यावरण, व्यसनमुक्ती अशा क्षेत्रातील आपले कार्य गौरवास्पद व भूषणावह असल्याचे सौ.कुबल यांना देण्यात आलेल्या सन्मानपत्रामध्ये नमूद केले आहे.   https://sindhudurgsamachar.in/maharashtraमहाराष्ट्र-लोकसेवा-आयो/

फोटो – संगीता कुबल

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here