Sindhudurg: सिंधुदुर्ग दौ-यात विविध प्रश्नांबाबत वेधले पालकमंत्र्यांचे लक्ष

1
227

वेंगुर्ला प्रतिनिधी- रेडी ते रेवस सागरी महामार्गावरील उभादांडा ते शिरोडा रस्त्याची दुरुस्ती करण्याबाबत तसेच उभादांडा सागरेश्वर किना-यावरील पर्यटन विकास महामंडळ विभागामार्फत उभारलेल्या वुडन अँड  हाऊस प्रकल्पाची चौकशी करण्याबाबत प्रश्नांवर भाजप युवा मोर्चाच्यावतीने महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे लक्ष वेधण्यात आले. याबाबत त्यांना निवेदन सादर करण्यात आले. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-रेडी-येथील-रक्तदान-शिबि/

सिंधुदुर्ग दौ-यावर असलेल्या पालकमंत्री रविद्र चव्हाण यांची भाजप युवा मोर्चाच्यावतीने जिल्हाध्यक्ष भाई सावंत यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस हितेश धुरी, जिल्हा चिटणीस तथा परबवाडा उपसरपंच हेमंत गावडे, जिल्हा चिटणीस तुषार साळगावकर, भूषण आंगचेकर, मारुती दोडशनट्टी यांनी भेट घेऊन वेंगुर्ला तालुक्यातील विविध प्रश्नांवर लक्ष वेधले. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-तेजस्वी-अबॅकस-मधील-विद्/

रेडी रेवस हा सागरी महामार्ग असून उभादांडा ते रेडी रस्ता संपूर्णपणे खड्डेमय झालेला आहे. त्याचा सर्वसामान्य नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याची देखभाल दुरुस्ती, डांबरीकरण व नूतनीकरणाची सर्वस्वी जबाबदारी बांधकाम उपविभागीय अधिकारी यांच्यावर राज्य शासनाने निश्चित केलेली आहे. या रस्त्याबाबत ग्रामपंचायत, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनीधी व नागरिकांनी प्रत्यक्ष तसेच लेखी स्वरुपात रस्ता दुरुस्ती डांबरीकरण व नूतनीकरणाची वेळोवेळी मागणी करून सुद्धा बांधकाम विभागाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही.

तसेच उभादांडा सागरेश्वर येथील महाराष्ट्र पर्यटन विभागामार्फत उभारण्यात आलेला वूडन अॅण्ड हाऊस प्रकल्प गेली पाच वर्ष धूळ खात पडला आहे. लाखो रुपये खर्च करून सदरचा प्रकल्प उभा करण्यात आला. त्यातील काही तंबू हे समुद्राच्या लाटांत पाण्यासोबत वाहूनही गेल. या प्रकल्पाची चौकशी होवून संबंधीत अधिका-यांवर कारवाई करुन प्रकल्प सुसज्ज असा पर्यटनात्मक उद्देशाने सुरु करण्यात यावा. उभादांडा गाव हा पर्यटनात्मक दृष्टीने व शहराच्या लगत असल्यामुळे पर्यटनदृष्ट्या सदर गावाचा विकास व रोजगाराच्या संधी गावात उपलब्ध व्हायला हव्यात. सर्व गंभीर बाबींचा विचार करुन आपल्याकडून योग्य तो न्याय मिळावा अशी मागणी भाजप युवा मोर्चाच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

दरम्यान याबाबत तात्काळ अधिका-यांना सूचना करून रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी सूचना करण्यात येतील तर सागरेश्वर किना-यावरील प्रकल्पाची माहिती घेऊन योग्य कार्यवाही करण्यात येईल असे अश्वासन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले आहे.

फोटोओळी – पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या समवेत भापज युवा मोर्चाच्या पदाधिका-यांनी चर्चा केली.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here