प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर
कणकवली- काळाबरोबर औषध दुकानदारांनी अद्ययावत असणे अत्यंत गरजेचे आहे. १९४० मध्ये तयार झालेल्या ” ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टमध्ये याचे संपूर्ण विवेचन केले आहे. त्यामुळे इतर व्यवसायापेक्षा ग्राहकांच्या औषध दुकान म्हणजेच “फार्मसी” कडे पाहण्याचा दृष्टिकोन विश्वासावर अवलंबून आहे. किंबहुना तो प्रतिष्ठिततेचा व्यवसाय मानला जातो.प्रशासन सुद्धा तळागाळातल्या रुग्णांचा विचार करून, नियम- कायदे बनवीत असल्याने, प्रत्येकाने फार्मसी व्यवसायाला वेगळ्या उंचीवर नेण्याचा सदैव प्रयत्न करावा,असे आश्वासक मार्गदर्शन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त मिलिंद पाटील यांनी केले. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-वेंगुर्ल्यात-भात-खरेदी
कणकवली-देवगड-वैभववाडी तालुक्याच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते.सुमारे तीन वर्षाच्या कोविड काळातील बंधनानंतर झालेल्या या बैठकीमध्ये सहा.आयुक्त मिलिंद पाटील आणि ड्रग इन्स्पेक्टर सोपान वाडे यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष आनंद रासम यांनी कोरोना काळातील फार्मासिस्टच्या कामाचे कौतुक करताना, ऑनलाईन व्यवसाय, बेकायदेशीर बाबी बद्दल सरकारचा बोटचेपेपणा, अधिकाऱ्यांच्या वरील दबाव याबाबत संघटनेच्या लढ्याचा मागोवा घेतला. यावेळी व्यासपीठावर कार्यकारणी सदस्य नंदू उबाळे, विवेक आपटे, बाळासाहेब डोरले,समीर खाड्ये, इत्यादी उपस्थित होते. बैठकीचे सुत्रसंचालन कुमार नाडकर्णी यांनी केले.
पुढे बोलताना मिलिंद पाटील म्हणाले,कायद्याची भीती दाखवण्यासाठी नाही परंतु औषध घेणाऱ्या ग्राहकाचा थेट संबंध फार्मासिस्ट पर्यायाने फार्मसीशी येतो. त्यामुळे कायद्यातील नियमांचे योग्य अनुपालन केले तर, ग्राहकाच्या मनातील फार्मासिस्ट आणि फार्मसी ची प्रतिमा उंचावेल, विश्वास वाढेल आणि दुकानाचा फायदाही. औषध विकत घेणे आज सगळ्यात सोपी गोष्ट झाली आहे. नियमांचे पालन करून, वेळच्यावेळी काळजी घेऊन काम केले तर,आणि अध्ययावत राहिल्यास आपल्या धंद्याचा स्तर वाढेल.त्यांनी यावेळी दृकश्राव्य फीती द्वारे या साऱ्या बाबी- कायदे- नियम उदाहरणासह स्पष्ट केले. आणि फार्मासिस्ट ना सजग केले.
ड्रग इन्स्पेक्टर सोपान वाडे यांनीही आपण धंद्याकडे कसे पाहतो? कायद्याचे पालन कसे करतो ? यावरच धंद्याची प्रगती असल्याचे सांगून सहाय्यक आयुक्त यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा अवलंब करावा असे आवाहन केले.