प्रतिनिधी: अभिमन्यू वेंगुर्लेकर
खेड- भरणे ग्रामपंचायत हद्दीतील आडे गुरूजी मार्गावर उभा असलेल्या बंद डंपरचे २ लाख ९० हजारचे साहित्य चोरीप्रकरणी पाच संशयितांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,जनार्दन पांडुरंग पवार (वय ३०, रा. भरणे ता.खेड), सचिन परशूराम तटकरे (वय ५५ रा. शिवतर, ता खेड), अनिल तुकाराम महाडिक (वय ५५, रा. शिवतर), अनिल अशोक जाधव (वय ३१ रा. तिसे), जयेश बाळाराम आंब्रे (जाबरेवाडी ता. खेड)अशी त्यांची नावेआहेत.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-प्रोटोलॉजी-लेझर-मशीन-मं
खेड तालुक्यातील भरणे येथे सोमवारी अज्ञात व्यक्ती डंपर चे भंगार चोरत असल्याचे डंपर मालकाने पोलिसांना कळवले. पोलिसांनी त्वरीत धाव घेत पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळील टेंम्पो (एम एच०८ डब्ल्यू ४३७८) व दुचाकी (एमएच ०७ एवाई १९९), गॅस कटर, एक व्यावसायिक एलपीजी सिलेंडरसह ६ गॅस सिलेंडर असा एकूण २ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी डंपर मालक राकेश एकनाथ कोळी यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. संशयितांना खेड न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


