वेंगुर्ला प्रतिनिधी- तालुका विधी सेवा समिती वेंगुर्ला व ग्रामपंचायत परबवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने परबवाडा ग्रामपंचायत येथे १० मार्च रोजी कायदेविषयक शिबिर संपन्न झाले. दिवाणी न्यायाधीश के.के.पाटील यांनी महिलांसाठी असलेल्या विविध कायद्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी गावातील ११० महिला उपस्थित होत्या. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-अभ्यासाबरोबर-खेळाची-आव/
सहन्यायाधीश डी.वाय.रायरीकर व गटविकास अधिकारी मोहन भोई यांनी महिलांच्या सुरक्षाविषयक माहिती दिली. अॅड.वेदिका राऊळ यांनी महिलांविषयी राज्य घटनेतील तरतूदींबाबत मार्गदर्शन केले. वकिल संघटनेच्या अध्यक्ष अॅड.सुषमा प्रभूखानोलकर यांनी महिलांवर आलेल्या संकटांवर कशी मात करावी व त्यासाठी कोणकोणते कायदे आहेत याबाबत माहिती दिली. सरपंच शमिका बांदेकर यांनी उपस्थितांना कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आपल्या दैनंदिन जीवनात वेळप्रसंगी उपयोग करावा असे आवाहन केले.
या कार्यक्रमाला महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी एस.टी.सामंत, उपसरपंच पपू परब, पोलिस हेडकॉन्स्टेबल रंजिता चौहान, रुपाली पाटील, ग्रामसेवक प्रविण नेमण, ग्रामपंचायत सदस्य संतोष सावंत, स्वरा देसाई, कार्तिकी पवार, अरुण गवंडे, सुहिता हळदणकर, हेमंत गावडे, माजी सभापती सारिका काळसेकर, माजी सरपंच इनासिन फर्नांडीस, अॅना डिसोजा, गौरी सावंत, मुख्याध्यापिका रॉड्रीक्स, मनवेल फर्नांडीस, संजय मळगांवकर, पत्रकार के.जी.गावडे व प्रथमेश गुरव उपस्थित होते.
यावेळी परबवाडा गावातील सविता परब, स्वाती पवार, शालिनी पारकर, रत्नप्रभा साळगांवकर, नयना मोर्ये, प्रतिक्षा भोवर, संयोगिता सातोस्कर, सुवर्णा सावंत, रोजालिन फर्नांडीस या कर्तबगार महिलांचा न्यायाधीश के.के.पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड.श्वेता चमणकर यांनी केले.
फोटोओळी – परबवाडा येथील कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमावेळी दिवाणी न्यायाधीश के.के.पाटील यांनी मार्गदर्शन केले.



[…] कुडाळ- शिवसेना शाखा,कुडाळ गांधीचौक रिक्षा युनियन तसेच गावराई, सातरल, हळवल आणि कणकवली शिवसेना शाखा येथील शिवजयंती (तिथीप्रमाणे) उत्सवांना कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी शुक्रवारी सायंकाळी भेटी दिल्या. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.कुडाळ शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवजयंती निमित्त भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी आ.वैभव नाईक यांचा सत्कार करण्यात आला.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेंगुर्ला-परबवाडा-ग्र… […]