Sindhudurrg: सिंधुदुर्ग जिल्ह्यात वानर माकडे यांच्या उपद्रवाबद्दल गुगल फॉर्म मध्ये नोंद करण्याचे आवाहन

0
52
वानर, माकडांचा कायमचा बंदोबस्त हवा, मागणीसाठी काळे यांचे उपोषण सुरु
वानर, माकडांचा कायमचा बंदोबस्त हवा, मागणीसाठी काळे यांचे उपोषण सुरु

रत्नागिरी: जिल्ह्यात वानर, माकडे यांचा उपद्रव होत आहे त्यांनी खालील गुगल फॉर्म मध्ये आपली नोंद करावी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वानर माकडे यांच्या उपद्रवा बद्दल विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मराठवाडा मध्ये वानर माकडे शासनातर्फे म्हणजेच वन विभागातर्फे पकडून अभयारण्यात सोडण्यात आली. त्याच धर्तीवर वानर माकडे शासनातर्फे पकडून अभयारण्यात सोडावी किवा उपद्रवी पशू घोषित करून मारण्यास परवानगी द्यावी असा प्रयत्न सुरू आहे. शासनातर्फे या विषयासाठी एक समिती नेमली आहे. या समितीसमोर ज्याना वानर माकडे यांचा उपद्रव होत आहे. त्यांनी खालील गुगल फॉर्म मध्ये आपली नोंद करावी. जेणेकरुन समिती समोर किवा शासनास वानर माकडे यांच्या उपद्रवामुळे त्रस्त असलेल्या लोकांची यादी देता येईल.

गूगल फॉर्म लिंक –
https://forms.gleb/JPjUEahnQj8CMYV48

अविनाश काळे, गोळप, रत्नागिरी
मोबा. 9422372212 अधिक माहीती साठी या नंबरवर संर्पक साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here