Tokiyo Paralympic: समारोप सोहळ्यात सुवर्णकन्या अवनी लेखरा बनली ध्वजवाहक

0
93

टोकियो पॅरालिम्पिकचा समारोप सोहळा पार पडला. यामध्ये भारतीय संघाची ध्वजवाहक म्हणून अवनी लेखराला हा मान मिळाला.टोकियोमध्ये 19 वर्षीय अवनी लेखराने नेमबाजीत एका सुवर्ण पदकासह दोन पदके जिंकली आहेत. अवनीने 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये SH1 प्रकारात सुवर्णपदक आणि 50 मीटर रायफल 3 स्थितीत कांस्य पदक जिंकले. आहे.

भारताने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये 5 सुवर्णांसह 19 पदके जिंकली. पदकतालिकेत भारत 24 व्या स्थानावर आहे. पॅरालिम्पिक क्रीडा दरम्यान, 163 देशांतील सुमारे 4500 खेळाडू 22 खेळांमध्ये 540 स्पर्धांमध्ये भाग घेत आहेत. भारताच्या खात्यात आतापर्यंत 18 पदके आली आहेत, ज्यात 4 सुवर्ण, 8 रौप्य आणि 6 कांस्य आहेत.पुढील पॅरालिम्पिक 2024 मध्ये पॅरिसमध्ये होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here