Top News: दिलासादायक! करोनाच्या नव्या व्हेरिएंटचे चारही रुग्ण झाले बरे

0
58
दिलासादायक! करोनाच्या नव्या व्हेरिएंटचे चारही रुग्ण झाले बरे

नवी दिल्ली– शेजारच्या चीनमध्ये करोनाचा जो नवा अवतार अर्थात व्हेरियंट आढळला आहे, त्यामुळे जगात आणि भारतातही काहीसे काळजीचे वातावरण आहे. हा व्हेरियंट किती धोकादायक असेल याचा विचार आणि तपासणी केली जाते आहे. मात्र त्यातच सगळ्यांत दिलासादायक बातमी म्हणजे ज्या चार जणांना या व्हेरियंटची लागण झाली होते ते सगळे बरे झाले आहे. विशेष म्हणजे त्यांना कोणालाही रूग्णालयात दाखल करण्याची गरज पडली नसल्याचे सांगण्या आले.https://sindhudurgsamachar.in/sindhudurgशालेय-शिक्षण-मंत्री-दीप/

याबाबत एका वाहिनीशी बोलताना प्रख्यात डॉक्‍टर नरेश त्रेहान म्हणाले की, ज्यांनी अगोदर करोना प्रतिबंधक लस घेतली आहे त्यांना नव्या व्हायरसची लागण होते आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच लागण झाली तर संसर्ग किती धोकादायक असेल तेही पाहावे लागणार आहे. कारण ओमिक्रॉनमध्ये ताप, डोकेदुखी होत होती. मात्र फुफ्फुसावर त्याचा फार परिणाम झाला नाही. भारतात अनेक जणांनी लस घेतली आहे आणि अनेक जण करोनातून बरेही झाले आहेत.

करोना झाल्यावर प्रतिकार शक्ती तयार होत असते. बूस्टरमुळेही अँटीबॉडी तयार झाल्या आहेत. बीएफ. 7 चे सगळे रूग्ण बरे झाले असले तरी आपल्याला सतर्क राहावे लागणार आहे. कारण त्याचा पूर्ण डेटा आपल्याकडे उपलब्ध नाही. गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करणे, गर्दी शक्‍यतो टाळणे, खोकला अथवा सर्दी झालेल्या व्यक्तीने कुटुंबातील अन्य सदस्यांपासून लांब राहणे अशी काळजी घेण्याची आवश्‍यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here