UGC NET December 2026 Exam Schedule जाहीर; १४ ते २१ डिसेंबरदरम्यान विषयनिहाय परीक्षा

0
10
UGC NET December 2026 Exam Schedule जाहीर; १४ ते २१ डिसेंबरदरम्यान विषयनिहाय परीक्षा
UGC NET December 2026 Exam Schedule जाहीर; १४ ते २१ डिसेंबरदरम्यान विषयनिहाय परीक्षा

UGC NET December 2026 Exam Schedule जाहीर; १४ ते २१ डिसेंबरदरम्यान विषयनिहाय परीक्षा

नवी दिल्ली :
महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्रता, कनिष्ठ संशोधन अधिछात्रवृत्ती (JRF) तसेच पीएच.डी. प्रवेशासाठी महत्त्वाची असलेल्या UGC-NET डिसेंबर २०२६ परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA) जाहीर केले आहे. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत सूचनेनुसार ही परीक्षा १४, १५, १६, १७, १८ आणि २१ डिसेंबर २०२६ रोजी संगणकाधारित (CBT) पद्धतीने घेतली जाणार आहे.
परीक्षा दोन सत्रांमध्ये होणार आहे. पहिले सत्र सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत, तर दुसरे सत्र दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत असेल. उमेदवारांनी आपल्या विषयाची परीक्षा तारीख आणि सत्र अधिकृत वेळापत्रकात तपासावे.
UGC-NET डिसेंबर २०२६ : विषयनिहाय परीक्षा वेळापत्रक
तारीख सत्र १ (सकाळी ९ ते १२) सत्र २ (दुपारी ३ ते ६)
१४ डिसेंबर इतिहास, पाली, प्राकृत, तुलनात्मक साहित्य संगणकशास्त्र, पर्शियन, रशियन, बंगाली, गृहविज्ञान, संगीत, लोकसंख्या अभ्यास
१५ डिसेंबर लोकप्रशासन, शिक्षण, समाजकार्य, मल्याळम, उर्दू, गुन्हेशास्त्र, नृत्य-नाट्य, आदिवासी व प्रादेशिक भाषा, लोकसाहित्य मानसशास्त्र, मैथिली, अरबी, व्यवस्थापन, शारीरिक शिक्षण, संस्कृत पारंपरिक विषय, आयुर्वेद जीवशास्त्र, आपत्ती व्यवस्थापन
१६ डिसेंबर राज्यशास्त्र, धर्मांचा तुलनात्मक अभ्यास, जपानी, डोगरी वाणिज्य, संरक्षण व सामरिक अभ्यास, भारतीय संस्कृती, बौद्ध-जैन-गांधीवादी व शांतता अभ्यास, राजस्थानी, भाषाशास्त्र
१७ डिसेंबर इंग्रजी, चिनी, कोकणी, स्पॅनिश, काश्मिरी दृश्य कला, संग्रहालयशास्त्र व संवर्धन, पंजाबी, तमिळ, भूगोल, मराठी, कामगार कल्याण व मानव संसाधन व्यवस्थापन, संताली
१८ डिसेंबर हिंदी, अरब संस्कृती व इस्लामिक अभ्यास, भारतीय ज्ञान प्रणाली, मणिपुरी, कन्नड, जर्मन, सिंधी, फ्रेंच जनसंवाद व पत्रकारिता, इलेक्ट्रॉनिक विज्ञान, महिला अभ्यास, कायदा, तेलुगू, न्यायवैद्यक विज्ञान, नेपाळी, ग्रंथालय व माहितीशास्त्र, तत्त्वज्ञान
२१ डिसेंबर अर्थशास्त्र, पर्यावरणशास्त्र, हिंदू अध्ययन, मानववंशशास्त्र, बोडो, गुजराती, संस्कृत, आंतरराष्ट्रीय संबंध व संबंधित अभ्यासविषय, मानवी हक्क आसामी, समाजशास्त्र, योग, पर्यटन व्यवस्थापन, प्रौढ शिक्षण, पुरातत्त्वशास्त्र, ओडिया, सामाजिक वैद्यक व सामुदायिक आरोग्य, सांख्यिकी, वनीकरण
विषयांची अधिकृत नावे, विषय कोड आणि काही संयुक्त विषयांची संपूर्ण व्याप्ती पाहण्यासाठी NTA चे मूळ वेळापत्रक तपासावे.
परीक्षा केंद्र आणि प्रवेशपत्राबाबत महत्त्वाची माहिती
  • परीक्षा केंद्राचे शहर: संबंधित परीक्षेच्या तारखेच्या २१ दिवस आधी NTA संकेतस्थळावर शहराची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे.

  • परीक्षा पद्धत: संगणकाधारित परीक्षा (CBT).

  • अधिकृत संकेतस्थळ: ugcnet.nta.nic.in

  • ई-मेल: [email protected]

  • हेल्पलाइन: ०११-४०७५९०००

उमेदवारांनी विषयनिहाय वेळापत्रक काळजीपूर्वक तपासून परीक्षेची तयारी करावी. परीक्षा केंद्राचे शहर, प्रवेशपत्र आणि अन्य सूचनांसाठी NTA च्या अधिकृत संकेतस्थळाला नियमित भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here