Yaas: पश्चिम बंगाल, ओडिशात ‘यास’चं थैमान

0
91

यास चक्रीवादळाने ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या किनारी भागात थैमान घातल्यानंतर आता चक्रीवादळानं झारखंडच्या दिशेनं मोर्चा वळवला आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दिवसभरात सुमारे १२ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. पूर्व किनारपट्टीवर उत्तर ओडिशामध्ये यास चक्रीवादळाचा तडाखा बसला. या भागामध्ये तब्बल १२० ते १४० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांनिशी हे चक्रीवादळ धडकलं. 

एनडीआरएफ, कोस्ट गार्ड, भारतीय नौदल अशा सर्व यंत्रणा बचावकार्य करत आहेत.यास चक्रीवादळाने घरांचं आणि नागरी सुविधांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.यास चक्रीवादळानं झारखंडच्या दिशेनं आपला मोर्चा वळवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here