टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू जबरदस्त कामगिरी करत आहे. टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या अवनी लेखराने आणखी एक इतिहास रचला आहे. अवनीने भारताला आणखी एक पदक जिंकून दिले आहे.त्यानंतर टोक्यो पॅरालिम्पिकमधील 50 मीटर रायफल थ्री पोजिशन स्पर्धेत अवनीने कांस्य पदक जिंकले आहे. अवनीच्या या जबरदस्त कामगिरीचे खूपच कौतुक होत आहे.एकाच स्पर्धेत दोन पदकं जिंकणारी अवनी लखेरा ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
आज प्रवीण कुमारने उंच उडीत रौप्य पदक जिंकत भारताच्या खात्यात आणखी एक पदक दिले.