केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत केंद्रशाळा दोडामार्ग नं. १ चे वर्चस्व
दोडामार्ग l सुमित दळवी
केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेतून ग्रामीण भागातील मुलांना प्रेरणा मिळते शिक्षक व पालक यासाठी अपार मेहनत घेत असतात त्यातूनच नवा खेळाडू तयार होत असतो असे प्रतिपादन कसई दोडामार्ग नगरपंचायचे शिक्षण व आरोग्य सभापती संध्या प्रसादी यांनी केले आहे
केंद्रस्तरीय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव २०२५ या स्पर्धा दोडामार्ग केंद्र शाळा नं १ या प्रशालेत संपन्न झाल्या कला क्रीडा समूहनृत्य ज्ञानी मी होणार अशा विविध प्रकारामध्ये दोडामार्ग केंद्रशाळा नं. १ च्या विद्यार्थानी सांघिक व वैयक्तिक अशा विविध क्रीडा प्रकारामध्ये यश संपादन करून चॅम्पियन शिप आपल्याकडे ठेवत वर्चस्व ठेवले आहे
यावेळी विस्तार अधिकारी यशवंत गवस सुजित गायकवाड शिक्षण प्रेमी संदीप गवस केंद्रप्रमुख जोशी मॅडम दोडामार्ग केंद्रशाळा नं १ प्रशालेचे मुख्याध्यापक गावित सर नाईक मॅडम काळे मॅडम रेडकर मॅडम इतर शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निंबाळकर सर यांनी केले.


