सोनवलं येथे बिबट्याच्या हल्लात गाईचा मृत्यू
दोडामार्ग l सुमित दळवी
सोनावल येथे लक्ष्मण वरक यांच्या गुरांच्या गोठ्यात बिबट्याने थेट शिरकाव करून तब्बल ५ वर्षांची गाय ठार मारली. या हल्ल्यामुळे वरक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटना घडताच वनविभागाचे अधिकारी श्री. कोळेकर तसेच पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर चिन्मय पटकारे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पंचनामा पूर्ण केला.
लक्ष्मण वरक यांच्या गाई, एक म्हैस व वासरे अशी जनावरे आहेत. रविवारी मध्यरात्री त्यांना जनावरांचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला. यावेळी घरातील मंडळींनी गोठ्यात जाऊन पाहिले असता बिबट्याने एका गाईवर हल्ला केल्याची त्यांना दिसून आले. त्यांनी यावेळी आरडाओरडा केल्याने बिबट्याने तिथून धूम ठोकली बिबट्याला गोठ्यात पाहून घरातील मंडळींची भीतीने गाळण उडाली
सोमवारी सकाळी या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली वनविभागाचे अजित कोळेकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चिन्मय पटकारे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली व रितसर पंचनामा केला. वनविभागाने या बिबट्याचा वेळीच बंदोबस्त करावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा संदेश वरक यांनी वनविभागाला दिला.


