नगरपंचायत निवडणूक मतमोजणी २१ डिसेंबरला; आचारसंहितेच्या सावटात हिवाळी अधिवेशन

0
109

मुंबई

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी रविवारी, २१ डिसेंबर रोजी करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे राज्य निवडणूक आयोगाची आचारसंहिता त्याच दिवशीपर्यंत लागू राहणार असून याचा थेट परिणाम ८ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर होणार आहे.

हे पण वाचा सोनवलं येथे बिबट्याच्या हल्लात गाईचा मृत्यू

यंदाचे हिवाळी अधिवेशन केवळ एका आठवड्यासाठी म्हणजे ८ ते १४ डिसेंबरदरम्यान होणार आहे. आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा कालावधी निश्चित करण्यात आला. बैठकीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते. सुरुवातीला दोन आठवड्यांचे अधिवेशन ठेवण्याची चर्चा होती, मात्र अंतिमतः रविवारीचा समावेश करून ते एका आठवड्यात पूर्ण करण्याचा निर्णय घेतला गेला.

आचारसंहितेमुळे अधिवेशनातील घोषणा, निर्णय आणि शासकीय कार्यक्रमांवर मर्यादा येणार आहेत. त्यामुळे महत्त्वाच्या चर्चांवर या बंधनांचे सावट राहणार असून सरकारला काही निर्णय पुढे ढकलावे लागू शकतात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here