अफगाणिस्तान राजधानी काबूलपासून तालिबानी अतिरेकी अवघ्या 11 किमीवर आहे. आले आहेत.तालिबानने शनिवारी राजधानी काबूलच्या दक्षिणेकडील लोगार प्रांतावर कब्जा केला.तालिबानने राजधानीसह संपूर्ण प्रांतावर कब्जा केला आहे. ते शनिवारी काबूल प्रांतानजीकच्या एका जिल्ह्यातही पोहोचले. तालिबान राजधानी काबूलपासून केवळ ११ किमीवर आहे. ते दक्षिणेकडून ८० किमी दूर आहेत. तालिबानने ३४ पैकी २० प्रांतांवर ताबा मिळवला आहे.
अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी राष्ट्राला संबाेधित करताना म्हणाले, सरकार हिंसा व लोकांचे विस्थापन थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. स्थैर्य सुनिश्चित करत आहे. अफगाणींवर ‘लादलेल्या युद्धात’ आणखी हत्या खपवून घेतल्या जाणार नाहीत. सध्या अफगाण सुरक्षा व लष्कराला पुन्हा संघटित करणे सरकारची सर्वोच्च प्राथमिकता अाहे. सरकारने लोकप्रतिनिधी आणि अांतरराष्ट्रीय भागीदारांसोबत योग्य राजकीय तोडग्यासाठी विचारविनिमय सुरू केला आहे.
तालिबानने अफगाणिस्तानात भारताने लष्करी हस्तक्षेप करू नये असा इशारा दिला आहे.भारताने आमच्या देशात लष्करी हस्तक्षेप केला तर ते त्यांच्यासाठी चांगले ठरणार नाही. अफगाणिस्तानात इतर देशाच्या लष्कराची स्थिती भारताने पाहिली आहे. आम्ही भारतासह इतर कोणत्याही देशांचे दूतावास आणि राजदूतांवर हल्ला करणार नसल्याचेही तालिबानचे प्रवक्ते सुहैल शाहीन