प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना जिल्ह्यातील 1000 ग्राहक झाले स्वावलंबी

0
210
महावितरणचा ‘सुरक्षा मंत्र’ प्रत्येक सोमवारी तांत्रिक कर्मचारी घेताहेत विद्युत सुरक्षेची शपथ
महावितरणचा ‘सुरक्षा मंत्र’ प्रत्येक सोमवारी तांत्रिक कर्मचारी घेताहेत विद्युत सुरक्षेची शपथ

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना जिल्ह्यातील 1000 ग्राहक झाले स्वावलंबी

जिल्ह्यात एकूण 3.34 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित

सिंधुदुर्ग |  प्रतिनिधी

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेत महावितरण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 1000 ग्राहक विजेबाबत स्वावलंबी झाले आहेत. त्यांच्या घराच्या छतावर सौर पॅनेलच्या माध्यमातून 3.34 मेगावॅट इतकी वीज निर्मिती होत आहे. वीज बचत, पर्यावरण संरक्षण आणि आर्थिक लाभ अशा तिहेरी फायद्यांनी ही योजना नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.  जिल्ह्यातील जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग मंडलाचे अधीक्षक अभियंता अभिमन्यु राख यांनी केले आहे.

हे पण वाचा राज्य विधिमंडळाचे नागपूर हिवाळी अधिवेशन ८ ते १४ डिसेंबर दरम्यान

केद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेस वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. घराच्या छतावर 1 ते 3 किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे घरगुती ग्राहकांना दरमहा सुमारे 120 ते 360 युनिट वीज मोफत मिळविण्याची संधी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत मिळत आहे. घरगुती वीज ग्राहकांना छतावर सौर ऊर्जानिर्मिती संच बसवता यावा, यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदराने कर्जाची प्रक्रियाही सुलभ करण्यात आली आहे. याबरोबरच महावितरणकडून 10 किलोवॅटपर्यंतच्या अर्जांना स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे. सौर नेट मीटरदेखील उपलब्ध करून देण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here