विशाल परब यांनी वेंगुर्लेत मतदारांसह उमेदवारांची घेतली भेट

0
172
विशाल परब यांनी वेंगुर्लेत मतदारांसह उमेदवारांची घेतली भेट
विशाल परब यांनी वेंगुर्लेत मतदारांसह उमेदवारांची घेतली भेट

विशाल परब यांनी वेंगुर्लेत मतदारांसह उमेदवारांची घेतली भेट

वेंगुर्ला

भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल परब यांनी वेंगुर्लेत मतदारांसह उमेदवारांची घेतली भेट घेत संवाद साधला. या दौऱ्यादरम्यान परब यांनी बुथ स्तरावरील संघटनात्मक रचना, आगामी निवडणुकांची तयारी, आणि कार्यकर्त्यांना भेडसावणाऱ्या स्थानिक समस्या यावर सखोल चर्चा केली. कार्यकर्त्यांनी मांडलेल्या समस्यांवर तत्काळ तोडगा काढण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

हे पण वाचा एकनाथ शिंदेंच्या काळ्या बॅगा पुन्हा चर्चेत, वैभव नाईक यांचे गंभीर आरोप

भाजपच्या युवा नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा आणि सामान्य नागरिकांचा दृढ विश्वास आहे. त्यांचे हे दौरे केवळ निवडणुकीच्या तयारीचा भाग नसून, पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्याच्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. वेंगुर्ला नगरपालिकेतील कार्यकर्त्यांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आगामी काळात श्री. परब यांच्या नेतृत्वाखाली भाजपची ताकद या भागात निश्चितच वाढणार, हे स्पष्ट होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here